कालबाह्य वसाहतीत कर्मचाºयांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 10:24 PM2017-10-24T22:24:31+5:302017-10-24T22:24:42+5:30
तालुका प्रशासनातील महत्वाच्या घटक असलेल्या पंचायत समिती कार्यालयात शेकडो कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतात. त्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी दूरदूरवरुन येथे कर्तव्य बजावण्यासाठी येतात.
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुका प्रशासनातील महत्वाच्या घटक असलेल्या पंचायत समिती कार्यालयात शेकडो कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतात. त्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी दूरदूरवरुन येथे कर्तव्य बजावण्यासाठी येतात. अशात त्यांना निवासाची सोय आवश्यक असते. परंतु सालेकसा पंचायत समिती परिसरात आजही कर्मचाºयांना कालबाह्य झालेल्या जीर्ण व पडक्या इमारतीच्या वसाहतीत वास्तव्य करावे लागत आहे.
प्रत्येक क्षेत्रात आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत असून पंचायत समिती कर्मचाºयांसाठी सोयी सुविधायुक्त क्वॉर्टर का उपलब्ध झाले नाही, याचे आश्चर्य वाटत आहे. आजघडीला जीर्ण व पडक्या गवताळ परिसराने घेरलेल्या परिसरात काही कर्मचाºयांना जीव मुठीत घेवून येथे राहावे लागत आहे. यापेक्षा मोठे दुर्देव कोणते असावे.
जवळपास ३५ -४० वर्षांपूर्वी पंचायत समितीचे कामकाज चालविण्यासाठी कौलारु इमारत तयार करण्यात आली होती. त्याच बरोबर पंचायत समिती परिसरात कर्मचाºयांना वास्तव्य करण्यासाठी कौलारु छताची कर्मचारी वसाहत तयार करण्यात आली होती.
त्यावेळच्या सोयीप्रमाणे ती वसाहत कर्मचाºयांसाठी पुरेपुर सोयीस्कर होती. परंतु कालांतराने भौतिक सोयीसुविधा कमी वाटू लागल्या. त्यांचे स्वरुप बदलू लागले व लोकांचे वास्तव्य कौलारु छतापासून स्लॅप छताच्या इमारतीमध्ये होऊ लागले. त्यानुसार पंचायत समिती परिसरातील वसाहतीतसुद्धा बदल करुन आधुनिक सोयी सुविधायुक्त वसाहत तयार होणे गरजेचे होते. परंतु पंचायत समितीच्या स्थापनेला जवळपास ५५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही नवीन कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले नाहीे. त्यामुळे कर्मचाºयांना पडक्या इमारतीमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.
जवळपास १० वर्षांपूर्वी पंचायत कार्यालयाचे जीर्णोद्धार करण्यात आले. तेव्हा कौलारु छत काढून स्लॅब टाकण्यात आला. परंतु कर्मचारी वसाहतीत कोणतेही जीर्णोद्धार करण्यात आले नाही व त्या वसाहतीत क्वॉर्टर जसेच्या तसेच राहिले. त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी कोणतेच प्रयत्न करण्यात आले नाही. दरम्यान काही इमारती पक्क्या स्वरुपाचे बनविण्यात आले. त्यात पंचायत समितीचे काही आॅफीस सुरू करण्यात आले.
परंतु त्या इमारती निकृष्ट दर्जाच्या असल्याने कोणत्याही कामाचे राहिल्या नाही. स्लॅबवरुन पाणी गळत आहे. त्यातच कार्यालयीन कामकाज केले जात आहे.
दिव्याखाली अंधार
पंचायत समितीच्या माध्यमातून शासन-प्रशासन स्तरावर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी कठोरतेने नियम पालन करायला लावले जात आहेत. परंतु त्याच पंचायत समितीमध्ये कार्यरत कर्मचाºयांना स्वच्छ परिसर व सोयीसुविधायुक्त आवास शासनाकडून उपलब्ध करून दिले जात नाही. परिसरात स्वच्छतेकडे सपेशल दुर्लक्ष केले जात आहे. यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार. शासनाने लोकांना जनजागृती करुन स्वच्छतेचे धडे देण्यापूर्वी आपल्या अधिनस्थ विभागात, परिसरात आणि आपल्या अधिनस्त कार्यरत कर्मचाºयांना स्वच्छतेप्रती जागृत करुन सजग ठेवणे आवश्यक आहे.
स्वच्छतेचा अभाव
एकीकडे कर्मचारी वसाहती जीर्ण व पडक्या झाल्या आहेत. त्याचबरोबर या परिसरात सर्वत्र अस्वच्छता व घाण पसरलेली आहे. क्वॉर्टर परिसरात उंच गवत वाढलेला आहे. छतावरील कवेलू उडालेले, भिंतीला भगदाड पडले, साप, विंचूचा नेहमी धोका कायम असतो. अशाही स्थितीत काही कर्मचारी येथे वास्तव्य करीत आहेत.