अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हा
By admin | Published: May 7, 2017 12:11 AM2017-05-07T00:11:12+5:302017-05-07T00:11:12+5:30
परवाना प्राप्त दारू दुकानांना ५०० मीटरची अट घातल्याने ९९ टक्के दुकाने बंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परवाना प्राप्त दारू दुकानांना ५०० मीटरची अट घातल्याने ९९ टक्के दुकाने बंद झाली. त्यामुळे अवैध दारू जोमात सुरू आहे. त्या अवैध दारूविक्रेत्यांव जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली.
रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गर्रा येथील श्रीराम दरोडे (५५) याला दारु विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. डुग्गीपार पोलिसांनी सौंदड येथील प्रदिप श्रावण बिलोणे (३६) याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, पाटेकुर्रा येथील अंजना मल्लेश बालसणवार (५०) या महिलेकडून पाच नग देशी दारुचे पव्वे, गल्लाटोला येथील रविंद्र लेखराम गणवीर (३२) याच्याकडून चार नग देशी दारुचे पव्वे, रामाटोला येथील अमरलाल महारु शरणागत (५८) याच्याकडून ४ नग देशी दारुचे पव्वे, सावली येथील मनोज भरतलाल रत्नाकर (३४) याच्याकडून १० नग देशी दारुचे पव्वे, मिताराम टेकचंद सुलाखे (३८) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, शिकारीटोला येथील बिसन गेंदलाल टेकाम (४५) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, कालीमाटी येथील मारोती भागवत परपलवार (५२) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, तिरोडा पोलिसांनी बोरटोला येथील प्रतिमा विनायक उके (३४) हिच्याकडून ७लिटर हातभट्टीची दारु, नवेगावखुर्द येथील सुशिला शिवाजी मांढरे (६१) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, लोधीटोला येथील धनिराम डोमण दुधबुरे (४५) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खमारी येथील सुमित उर्फ मायकल किशोर कांबळे (२५) याच्याकडून एक देशी दारुचा पव्वा जप्त करण्यात आला.