अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे गुन्हाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:00 AM2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:11+5:30

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी केल्यास बापाला शिक्षा करण्याचा वाहतूक नियम लागू करावा असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.

Offering a vehicle in the hands of minors is a crime | अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे गुन्हाच

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे गुन्हाच

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण विभाग सुरू करणार मोहीम : शिक्षा देण्याचा कायदा लागू करा

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी केल्यास बापाला शिक्षा करण्याचा वाहतूक नियम लागू करावा असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.
३ मार्च रोजी गोंदियाच्या गौशाला वार्डात झालेल्या अपघातात एका ६ वर्षाच्या निरागस मुलीचा अपघातात मृत्यू झाला. ट्रकची स्कुटीला धडक झाली. अल्पवयीन मुलगा स्कुटी चालवित असताना हा अपघात घडला. त्याला कायद्याचे ज्ञान नाही, वाहनाचा परवाना नाही तरीही रस्त्यावर बेधडक भरधाव वेगात वाहन चालवून मुलीचा बळी घेतला. या पार्श्वभूमीवर लोकमतने विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.जिल्ह्यातील हजारो पालक आपल्या पाल्यांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हातात वाहन देतात. १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले वाहन चालवित असताना रस्त्यावरील पादचाऱ्यांचा बळी घेतात. हजारो मुले विना परवाना वाहन चालवित असतात. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असते त्या चौकात हे अल्पवयीन मुले जात नाही. त्यांची नजर चोरून इतर गल्लीतून वाहन सुसाट वेगात चालवितात.
गोंदिया शहराची परिसथिती पाहता व्यापारी वर्गाने आर्डर केलेला माल हा केव्हाही खाली केला जातो. त्यांच्यासाठी ठरावीक वेळ असावा, माल खाली करताना वाहन व्यवस्थित पार्र्कींग करावे, गोंदिया शहरातील रस्त अरूंद असल्याने व्यापाऱ्यांची माल खाली करण्याची वेळ ठरावीक असावी, माल खाली करण्यासाठी वेळ द्यावा त्या वेळात माल खाली करणे अपेक्षीत आहे.
वाहन चालविण्यात स्वत:ला कुशल समजणारे हे अल्पवयीन बालके ओव्हरटेकच्या नादात अपघात करतात.वाहतूक पोलिसांच्या समोरून एखादा अल्पवयीन मुलगा किंवा नियमाचा भंग करणारा वाहन चालक पोलिसांच्या समोरून जोरात वाहन चालवत नेत असले तर त्याचा पाठलागही करणे पोलिसांना बंधनकारक आहे. अपघात होऊ शकतो म्हणून नियम तोडणाºयाचा पाठलाग करू नका असे आदेश आहेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

१९८ अल्पवयीन वाहन चालकांना दंड
अल्पवयीन मुले विना परवाना वाहन चालवितांना वाहतूक पोलिसांनी १९८ जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ९८ हजार रूपये दंडही वसूल करण्यात आला. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्याला कडक करताना अल्पवयीन मुलगा वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्या वडीलांना ३ वर्षाचा कारावास व १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा तो कायदा आणला तो महाराष्ट्रत लागू झाला नाही. तो आता लागू करण्याची गरज आहे.

पालकांनी आपल्या अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात वाहन देऊ नये,कुणीही भरधाव वाहने चालवू नका, ओव्हरटॅक करू नका, जड वाहन चालविणाऱ्यांनी वाहन अत्यंत कमी स्पीडने चालवावे, वळणावर वाहन पार्र्कींग करू नये.
- दिनेश तायडे,
पोलीस निरीक्षक
वाहतूक नियंत्रण शाखा

 

Web Title: Offering a vehicle in the hands of minors is a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.