नगराध्यक्षांच्या ‘पीए’ची अधिकाºयांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:05 PM2017-09-14T22:05:51+5:302017-09-14T22:06:16+5:30

कर्मचाºयांचा पगार का काढत नाही असे बोलून प्रशासकीय अधिकाºयांना नगराध्यक्षांच्या खासगी स्वीय सहायकाने (पीए) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

The officer of the PA's 'PA' | नगराध्यक्षांच्या ‘पीए’ची अधिकाºयांना शिवीगाळ

नगराध्यक्षांच्या ‘पीए’ची अधिकाºयांना शिवीगाळ

Next
ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : नगर परिषद कर्मचाºयांनी केले कामबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर्मचाºयांचा पगार का काढत नाही असे बोलून प्रशासकीय अधिकाºयांना नगराध्यक्षांच्या खासगी स्वीय सहायकाने (पीए) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. गुरूवारी सकाळी प्रशासकीय अधिकाºयांच्या दालनात ही घटना घडली. याप्रकारामुळे संतप्त नगर परिषद कर्मचाºयांनी कामबंद करून पोलीस ठाणे गाठले व तक्रार नोंदविली.
नित्यनेमाप्रमाणे आपल्या दालनात प्रशासकीय अधिकारी सी.ए.राणे काम करीत असताना सकाळी ११ वाजता दरम्यान नगराध्यक्षांचे खासगी स्वीय सहायक म्हणून काम पाहत असलेले टेकचंद फेंडारकर त्यांच्या दालनात आले. यावेळी फेंडारकर यांनी लेखा विभागात कार्यरत कर्मचारी राजा सोनवाने याचा पगार का काढत नाही, असे राणे यांना म्हटले.
मात्र सोनवाने मागील वर्षभरापासून कामावर येत नसल्याने त्याचा पगार निघाला नसल्याचे राणे यांनी सांगीतले असता फेंडारकर यांनी अश्लील शिवीगाळ केली तसेच राणे यांच्या अंगावर धावून गेले. मात्र तेथे अन्य कर्मचारी असल्याचे बघत फेंडारकर तेथून निघून गेले. मात्र सुमारे ११.२० वाजतादरम्यान फेंडारकर पुन्हा आले व राणे यांना कार्यालयाबाहेर निघ बघून घेतो म्हणत धमकी देऊन निघून गेल्याचे राणे यांनी सांगीतले.
नगर परिषदेतील अन्य कर्मचाºयांना घडलेला प्रकार कळताच सर्व एकत्र गोळा झाले व त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याधिकारी चंदन पाटील व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना माहिती देत थेट पोलीस ठाणे गाठले.
यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे स्वत: पोलीस ठाण्यात आले व प्रकार आपसी सामंजस्यातून सोडवून घेण्यास राणे यांना म्हटले. मात्र राणे व अन्य सर्व कर्मचाºयांत रोष व्याप्त असल्याने त्यांनी नकार देत तक्रार नोंदविली. एवढेच नव्हे तर कर्मचाºयांनी आपला रोष व्यक्त करीत गुरूवारी कामबंद ठेवले.
यापूर्वी घडल्या अशाच घटना
खुद्द नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेले फेंडारकर यांनी नगर परिषदेत कर्मचाºयांना शिवीगाळ केल्याची ही पहिली घटना नसल्याचे कर्मचाºयांनी याप्रसंगी सांगितले. यापूर्वी त्यांनी कित्येकदा कर्मचाºयांना शिवीगाळ केली. मात्र त्यांच्या वय लक्षात घेत अन्य कर्मचाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गुरूवारी मात्र त्यांनी थेट प्रशासकीय अधिकाºयांनाच शिवीगाळ केल्याने सर्वच कर्मचारी खवळले होते. कर्मचाºयांचा अपमान होत असल्याचा वारंवारचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे सांगत कर्मचाºयांनी पोलिसांत तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: The officer of the PA's 'PA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.