थेट कामगारांशी साधला अधिकाऱ्यांनी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:05 PM2018-05-12T22:05:40+5:302018-05-12T22:05:40+5:30
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वळद येथील ग्रामपंचायत शासकीय योजनांच्या माध्यमातून गतीशील व प्रगतीशील होत आहे. विविध योजनांचे आॅक्सीजन सारखा वापर करुन विकासाचे ध्येय जोपासत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वळद येथील ग्रामपंचायत शासकीय योजनांच्या माध्यमातून गतीशील व प्रगतीशील होत आहे. विविध योजनांचे आॅक्सीजन सारखा वापर करुन विकासाचे ध्येय जोपासत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत कुशल कामगारांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची माहिती मनरेगाच्या मजुरांना व गावकऱ्यांना देण्यात आली.
अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी एस.एम.पांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच किशोर रहांगडाले, सहा. गटविकास अधिकारी एल.एम. कुटे, विस्तार अधिकारी के.एम. रहांगडाले, ग्रामसचिव शैलेश परिहार, ग्रामपंचायत सदस्य ललीत बिसेन, दिलीप काटेखाये, ललीता रहांगडाले, धनश्री चौधरी, हंसगी रहांगडाले, पार्वता गडबे, पोलीस पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.
या वेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, ग्राम स्वराज्यची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आर्थिक दुर्बलांच्या उत्थानाकरिता सर्वांचे ध्येय असावे, असे मत व्यक्त केले. कामगारांना स्थानिक पातळीवर योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी वळद ग्रामपंचायतच्या कार्याची गती वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.त्यातही ग्रामपंचायत यशस्वी ठरत आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.
सरपंच रहांगडाले यांनी, गावाचा सर्वांगिण विकास होत आहे. अनेक योजना स्वयंस्फुर्तपणे राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा ठरत असल्याचे सांगितले. के.एम. रहांगडाले, ग्राम सचिव शैलेश परिहार यांनी कामगारांच्या मूलभूत सेवा, नरेगा योजनेंतर्गत राबविण्याचे कार्य व जवाबदारी याबाबद माहिती दिली.