संपत्ती घडविण्यापेक्षा संतती घडवा
By admin | Published: August 4, 2016 12:11 AM2016-08-04T00:11:07+5:302016-08-04T00:11:07+5:30
नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी ग्रामगीतेतील विचार प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहेत. सुजान नागरिकांनी संपत्ती घडविण्यापेक्षा संतती ..
प्रकाश महाराज वाघ : सत्कार सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळावा
अर्जुनी मोरगाव : नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी ग्रामगीतेतील विचार प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहेत. सुजान नागरिकांनी संपत्ती घडविण्यापेक्षा संतती घडविण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन प्रकाश महाराज वाघ यांनी रविवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात केले.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग जिल्हा गोंदियाच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अ.भा. गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, तर उद्घाटक म्हणून रामकृष्णदरी विश्वमानव मंइदरचे अध्यक्ष जनार्धनपंत पाटील होते. यावेळी ग्राम जीवन विकास परीक्षा विभागाचे सचिव गुलाबराव खवसे, परीक्षा नियंत्रण राधेशाम निमजे, आत्माराम निंबोरकर गडचिरोली, दशरथ कोरे नागपूर, सुखदेव वेठे, डॉ. मोकदम, सुनील तरोणे, दादा फुंडे, अहिल्या गोखले, मुक्ता हत्तीमारे, नुरचंद पाखमोडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मोरेश्वर कोरे, अशोक तरोणे, प्रतिक बोरकर, शुभम तरोणे, निशीकांत कोरे, दीपक सोनवाने, गोपाल कदम, उमेश ठाकरे, लोकेश कावळे, विरेंद्र चन्ने, प्राजक्ता परशुरामकर, श्रीकृष्ण कहालकर, ललीता ठाकरे, मोरेश्वर बोकडे यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मनोज खुरपुडे, राधेशाम तरोणे, नरेंद्र हिंगे, मोहन नाकाडे, दिलीप लोदी, दिलीप फुंडे, भूषण, गोवर्धन लंजे, दयाराम लंजे, तेजराम भेंडारकर, रमेश संग्रामे, सुरेंद्र भैसारे, पतीराम मुनेश्वर, संपत कठाने, हरिष पात्रीकर यांनी सहकार्य केले. आभार ग्रामगीताचार्य गुन्नीलाल बघेले गोरेगाव यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)