अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:11+5:30

केंद्र सरकारने केवळ शंभर रुपयांत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरूवातीला गॅस सिलिंडरचा दर कमी असल्याने तो गोरगरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या गॅस सिलिंडर १,०५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या याेजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर खरेदी करणे बंद करून पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे.

Oh world world, like on a frying pan ... | अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर...

अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर...

Next

मुन्नाभाई नंदागवळी
लोकमत न्यूज नेटवर्क 
बाराभाटी :  अनेक योजना या गरीब नागरिकांसाठी निर्माण केल्या जातात. पण अशा योजना जे सरकार राबविते तेच सरकार सामान्य नागरिकांना रस्त्यावर आणण्याचे काम करत असल्याचे चित्र आहे. अशाचप्रकारे केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना’ ही सामान्य नागरिकांच्या डोक्यावर बसली आहे. ही योजना मिळाली फक्त १०० रुपयांत, मात्र गॅस सिलिंडर आता १ हजार ५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे तो घेणे गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परिणामी ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारने केवळ शंभर रुपयांत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरूवातीला गॅस सिलिंडरचा दर कमी असल्याने तो गोरगरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 
सध्या गॅस सिलिंडर १,०५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या याेजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर खरेदी करणे बंद करून पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी ते चूल पेटवत आहेत. अखेर सरपणच आमची भूक भागविणार, असे महिला स्पष्टपणे सांगत आहेत. 

चुलीवरची भाकर हाच खरा स्वाभिमान...
- सिलिंडरच्या किमतीत खूप वाढ केल्यामुळे महिलांना पुन्हा चुलीकडे वळावे लागले. चुलीवरचा स्वयंपाकच गोड लागतो, कारण हे स्वाभिमानाचे असते. यावेळी बहिणाबाईंच्या ओळी खऱ्या ठरतात. 

‘अरे संसार संसार, 
जसा तवा चुलीवर... 
लागते हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर...’ 
या ओळी सार्थक ठरल्या आहेत.

 

Web Title: Oh world world, like on a frying pan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.