जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर

By Admin | Published: October 16, 2016 12:19 AM2016-10-16T00:19:49+5:302016-10-16T00:19:49+5:30

नवीन पेन्शन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा या मागणीसाठी विविध विभागाचे राज्य सरकारी कर्मचारी,

Old Pension for Employee Street | जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर

googlenewsNext

विशाल धडक मोर्चा : सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा शासनाविरुद्ध एल्गार
गोंदिया : नवीन पेन्शन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा या मागणीसाठी विविध विभागाचे राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सहकुटुंब मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात महसूल, शिक्षण, आरोग्य, पंचायत, वन, महिला व बालकल्याण, बांधकाम, परिवहन, तंत्रशिक्षण, कृषी, पाटबंधारे, भूमी अभिलेख, नगरपालिका, माध्यमिक, सहकार अशा सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
नवीन अंशदायी पेन्शन योजनेत १९८२ च्या नागरी पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन, अनुकंपा, ग्रॅच्युईटी, जी.पी.एफ.प्रमाणे सुविधा नाहीत. शासनाने १९८२ च्या जुन्या पेंशन योजनेत सुधारणा हा शब्द वापरुन कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
नवी अंशदायी पेंशन योजनेला विरोध करण्यासाठी व १९८२ ची नागरी जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करा, या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना गोंदियाच्या नेतृत्वात १५ आॅक्टोबरला इंदिरा गांधी स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये करुन मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सदर धडक मोर्चाचे आयोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष लिकेश हिरापूरे यांच्या नेतृत्वात राज्य उपाध्यक्ष नामदेव मेटांगे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये करण्यात आले. यात संदीप सोमवंशी, राहूल कळंबे, नितू डहाट, आशिष रामटेके, जे.व्ही. बुद्धेवार, चंदू दुर्गे, राजेंद्र कडव, शालिक कठाणे, दत्तात्रय बागडे, राजेश बिसेन, रोमा गोंडाणे, प्रवीण सागर, सुनील चौरागडे, संजय उके, सुनील राठोड, रवी भगत, शैलेष भदाणे, धमेंद्र पारधी, ओ.के. रहांगडाले, प्रकाश ब्राम्हणकर, तीर्थराज उके, रोशन लिल्हारे, मनोज गोंडाणे, रंजना रोकडे, गणेश पारधी, किशोर पटले, शिवम राठोड, गणेश पारधी, प्रफुल्ल मिश्रा, टी.बी. बोपचे, प्रमोद खंडारे, महेंद्र नागपुरे, आर.एस? बसोने, प्रशांत गुप्ता, भुपेंद्र शनवरे, ललीत बोपचे, अजय तितिरमारे, मुकेश रहांगडाले, भूषण लोहारे, एस.एस. सोदवाने, महेंद्र चव्हाण, सचिन धोपेकर, एम.आर.मेश्राम, प्रितम लाडे आदी पदाधिकारी, तसेच सर्व विभागातील कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

नवीन योजनेचा
कुटुंबीयांना फटका
नवीन पेंशन योजनेचा सर्वात जास्त फटका पडला तो सेवेत कार्यरत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांचा कुटुंबाला. त्यांना कोणताही आर्थिक लाभ शासनातर्फे मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच या नवीन पेंशन विरोधात कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे.

- गांधी टोपीने वेधले लक्ष
१ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेले हजारो कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. सर्वांनी पांढरे कपडे परिधान करुन डोक्यावर गांधी टोपी घातली होती.
‘एकच मिशन जुनी पेंशन’ असे फलक घेऊन शांतीपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा मार्गक्रमण करीत होता.
‘लागू करा, लागू करा, जुनी पेंशन लागू करा’ अशा घोषणा देत पुरूष-महिला कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: Old Pension for Employee Street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.