क्वालिटी रिपोर्ट विनाच सुरू होती जुनी सीटी स्कॅन मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आल्यानंतर हे महाविद्यालय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत अजुनही तयार झाली नसल्याने याच रुग्णालयातून कारभार सुरू आहे. सध्या कोरोनाचा कहर सुरू असून येथील अनागोंदी कारभार पुढे येत आहे.

Older CT scan machine started without quality report | क्वालिटी रिपोर्ट विनाच सुरू होती जुनी सीटी स्कॅन मशिन

क्वालिटी रिपोर्ट विनाच सुरू होती जुनी सीटी स्कॅन मशिन

Next
ठळक मुद्देतीन महिन्यापासून जुनी मशिन बंद : नवीन मशिन सुरू होईना, रुग्णांना बसतोय आर्थिक भुर्दंड

अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील गोरगरीब रूग्णांची परवड होवू नये यासाठी येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन लावण्यात आली होती. मात्र मागील तीन महिन्यांपासून ती मशिन बंद आहे. मशिनच्या क्वालिटी रिपोर्ट शिवाय ऐवढे दिवस या मशिनचा उपयोग आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. हा प्रकार म्हणजे रुग्णाच्या जीवाशी खेळच असल्याचे याच रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आल्यानंतर हे महाविद्यालय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत अजुनही तयार झाली नसल्याने याच रुग्णालयातून कारभार सुरू आहे. सध्या कोरोनाचा कहर सुरू असून येथील अनागोंदी कारभार पुढे येत आहे.पाच दिवसांपूर्वीच याच रुग्णालयात कार्यरत एका कर्मचाऱ्यांने त्याच्या वडिलाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णालयात कसा अनागोंदी कारभार सुरू आहे याचा पाढा वाचला होता.त्यामुळे पुन्हा हे रुग्णालय प्रकाश झोतात आले. गोरगरिब रुग्णांना खासगी रुग्णालय आणि नागपूर येथे सीटी स्कॅन करण्यासाठी जाण्याची वेळ येवू नये यासाठी सीटी स्कॅन मशिन लावण्यात आली होती. ही मशिन मागील तीन महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे नवीन सीटी स्कॅन मशिन खरेदी करण्यात आली. पण ती सुध्दा मागील दोन महिन्यांपासून सुरू झालेली नाही. या मशिनचा क्वॉलिटी रिपोर्ट एम्सच्या तज्ज्ञांकडून प्राप्त व्हायचा असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे जोपर्यंत एम्सच्या तज्ज्ञांकडून सीटी स्कॅन मशिनचा क्वालिटी रिपोर्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत ही मशिन कार्यान्वीत करता येत नाही. त्यापूर्वीच ही मशिन सुरू करणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे. यामुळे बरेचदा चुकीचा रिपोर्ट येवून चुकीचे निदान झाल्याने रुग्णांचा जीव सुध्दा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे क्वालिटी रिपोर्ट महत्त्वपूर्ण आहे. पण केटीएस रुग्णालयातील जुनी सीटी स्कॅन मशिन ही क्वालिटी रिपोर्ट विनाच कार्यान्वीत होती अशी माहिती येथील एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. त्यामुळे केटीएस जिल्हा रुग्णालयात कसा अनागोंदी कारभार सुरू असून रुग्णांच्या जीवाशी एकप्रकार खेळच केला जात आहे.

नवीन मशिन सुरू करण्यासाठी रिपोर्टची प्रतीक्षा
४मेडिकलमध्ये नवीन सीटी स्कॅन मशिनचे दोन दिवसांपूर्वी इन्स्ट्रॉलेशन पूर्ण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच तज्ज्ञांच्या चमुने नवीन सीटी स्कॅन मशिन सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तसेच या मशिनचा क्वालिटी चेक करण्यासाठी नागपूर येथील एम्सच्या तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून क्वालिटी रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर ही सीटी स्कॅन मशिन रुग्णांच्या सेवेत कार्यरत केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

केटीएसमधील जुनी सीटी स्कॅन मशिन मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. तर या मशिनच्या क्वालिटी रिपोर्ट संदर्भात मला माहिती नाही. नवीन सीटी स्कॅन मशिनचे इन्स्ट्रॉलेशन पूर्ण झाले आहे. एम्सकडून क्वालिटी रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर ही मशिन रुग्ण सेवेत कार्यान्वीत केली जाईल.
-डॉ. व्ही.पी.रुखमोडे,
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

Web Title: Older CT scan machine started without quality report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.