सर्वात जुन्या शाळेला केरकचऱ्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:37 PM2018-09-10T21:37:20+5:302018-09-10T21:37:38+5:30

तालुक्यातील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळखली जाणारी बाजार चौकातील प्राथमिक शाळा आजघडीला चारही बाजुंनी घाण व कचºयाच्या ढिगाºयांनी वेढलेली आहे. सांडपाण्याने भरलेली गटारे सुद्धा शाळेच्या परिसरात असून सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो.

The oldest school breaks the litter | सर्वात जुन्या शाळेला केरकचऱ्याचा विळखा

सर्वात जुन्या शाळेला केरकचऱ्याचा विळखा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, पालकांमध्ये रोष

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळखली जाणारी बाजार चौकातील प्राथमिक शाळा आजघडीला चारही बाजुंनी घाण व कचºयाच्या ढिगाºयांनी वेढलेली आहे. सांडपाण्याने भरलेली गटारे सुद्धा शाळेच्या परिसरात असून सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो. या बाबीकडे शालेय प्रशासनासह स्थानिक प्रशासन सुद्धा सपेशल दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
१९६० मध्ये सुरु झालेली आमगाव खुर्द (सालेकसा) येथील ही शाळा आज ५८ वर्षांची झाली असून या शाळेतून शिक्षण प्राप्त करुन मोठमोठ्या पदावर विद्यार्थी पोहोचले आहेत. परंतु या शाळेची परिस्थिती आज सर्वात दयनीय झाली आहे. शाळेत एकूण सात शिक्षक व १४० विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. मोठे दिग्गज राजकारणी या गावात राहत असून त्यांच्या डोळ्यादेखत चालणारी शाळा घाण व कचºयाच्या ढिगाºयात भरत असेल तर याला काय म्हणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य घडविणारे असून त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचे काम शिक्षण विभागासह स्थानिक प्रशासन करीत असल्याचे चित्र आहे. दुदैवाची बाब म्हणजे, या शाळेच्या एका बाजूला स्वच्छतेचा संदेश देणाºया महात्मा गांधी यांचा पुतळा आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारा जवळच सिमेंटची कचराकुंडी ठेवण्यात आली असून ती पूर्णपणे भरली आहे. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. या परिसरात राहणाºया लोक आणि दुकानदारांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. येथून गावातील सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या गेल्या असून या नाल्यातून पाणी पुढे वाहत नसल्याने घाण व दूषित पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे.
शाळेच्या बाजूलाच आठवडी बाजार भरत असून तेथील कचरासुद्धा शाळेच्या भिंतीजवळ पडून असतो. आश्चर्याची बाब म्हणजे शाळेच्या प्रवेश द्वारा लगत उंच गावत वाढलेले आहे. अशात विषारी जीवजंतूचा वावर असण्याची शक्यता असते.याकडे सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापकांसह शाळा समितीच्या लोकांचे दुर्लक्ष झाले आहे. समितीच्या एका सदस्याला विचारले असता, येथील समस्यांबद्दल आपण मुख्याध्यापकांशी चर्चा केली, परंतु त्यांनी योग्य पाऊल उचलून समस्या दूर करण्यासाठी हवे तसे प्रयत्न केला नसल्याचे सांगीतले.
या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी मुले गरीब मजुरांची असून त्यांना आपला दिवसभराचा वेळ आपल्या कामासाठी घालवावा लागतो. त्यामुळे ते एकदा आपल्या पाल्याला शाळेत पाठवून त्याकडे निश्चित होतात. परंतु त्यांच्या पाल्यांच्या भविष्याशी खेळ खेळण्याचे काम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु गरीबांच्या मुलांना सुद्धा चांगले शिक्षण मिळावे, त्यांना सुद्धा आधुनिक सोयी, सुविधा व स्वच्छ, सुंदर शाळा उपलब्ध व्हावी, या दिशेने कोणीच पाऊल उचलताना दिसत नाही.
शाळा समितीचे अध्यक्ष मालकन भोयर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आपली एक महिन्यापूर्वीच या शाळेत बदली झाली आहे. त्यामुळे येथील प्रशासनाबद्दल विस्तृत माहिती नसून स्वच्छतेच्या समस्येबद्दल यापुढे पाऊल उचलण्यात येईल.
-के.एन. शेंडे, मुख्याध्यापिका

सदर शाळा आमगाव खुर्दमध्ये असून नुकताच आमगाव खुर्दचा समावेश सालेकसा नगर पंचायतमध्ये झाला आहे. विद्यमान परिस्थितीत या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी निधी उपलब्ध नाही. यापुढे निधी आल्यावर संपूर्ण क्षेत्रात स्वच्छतेची कामे केली जातील.
आर.पी. चिखलखुंदे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, सालेकसा

शाळा परिसरात पसरलेल्या घाणीबद्दल स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी कळविण्यात आले. परंतु तरी सुद्धा लक्ष देण्यात आले नाही. काही दिवसातच गावातील काही युवकांच्या सहकार्याने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.
- सुनील असाटी, स्वच्छतादूत, सालेकसा

Web Title: The oldest school breaks the litter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.