तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:16 PM2023-08-31T13:16:59+5:302023-08-31T13:18:24+5:30

४ सप्टेंबरपर्यंत होणार चुकारे : उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

On the third day, the farmers' strike finally ended, Dy CM's promise to pay paddy by September 4 | तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे

googlenewsNext

गोंदिया : तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारपासून (दि. २८) आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आ. अग्रवाल यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ सप्टेंबरपर्यंत चुकारे जमा करण्याचे आश्वासन दिले. त्या शेतकऱ्यांनी बुधवारी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

धानाचे थकीत चुकारे तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारपासून आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर सोमवारपासून आंदोलन सुरू केले होते. आ. विनोद अग्रवाल यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाइलवर चर्चा केली. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक संदेश पाठवला. त्यात धानाचे थकीत चुकारे लवकरच दिले जातील, असे आश्वासन दिले. आ. अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न पुरवठा मंत्री, पणन महासंघाचे प्रधान सचिव, महासंघाचे प्रशासकीय संचालक यांच्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना तत्काळ धान विक्रीचे पैसे देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले. लवकरच धानाची रक्कम देण्याचा निर्णय घेऊन शासन शेतकऱ्यांना न्याय देईल, असे आश्वासन दिले.

४ सप्टेंबरपर्यंत धानाचे चुकारे देण्याचे आश्वासन

४ सप्टेंबरपर्यंत थकीत चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे शेतकरी दीपक कनसरे यांनी सांगितले.

चूक सोसायटीची, शिक्षा शेतकऱ्यांना

शेतकरी उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात. अशा कष्टकरी शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे नुकसान करणे हे सोसायटी चालकांचे मोठे पाप आहे. या प्रकरणातील दोषी संचालकांची लवकरात लवकर चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आपण त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

Web Title: On the third day, the farmers' strike finally ended, Dy CM's promise to pay paddy by September 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.