तीन तालुक्यातील दीडशे गावे महामार्गाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 11:57 PM2018-07-07T23:57:34+5:302018-07-07T23:58:10+5:30

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यातील दिडशे गावांना थेट राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाशी जोडण्याचे काम सुरू आहे.

 On one of the 150 villages of three talukas, on the highway | तीन तालुक्यातील दीडशे गावे महामार्गाच्या वाटेवर

तीन तालुक्यातील दीडशे गावे महामार्गाच्या वाटेवर

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्राम सडक योजना : ग्रामीण भागासाठी ठरणार वरदान

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यातील दिडशे गावांना थेट राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाशी जोडण्याचे काम सुरू आहे. यापैकी ८० टक्के कामे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता गावागावात पक्के डांबरीकरणाचे रस्ते पाहयला मिळत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.
राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेतंर्गत गावा-गावात पक्के डांबरी आणि सिमेंटचे रस्ते तयार करुन त्या गावांना थेट महामार्गाशी जोडण्याचे काम सुरू आहे. या योजनेची सुरुवात आ.संजय पुराम यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातून केली. मागील दीड वर्षात ७८ कोटी ७६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी खेचून आणला. यातून ३४ रस्त्यात १४४ कि.मी.चे बांधकाम करण्यात आले. यामध्ये २०१५-१६ ते २०१६-१७ या वित्त वर्षात १६ रस्ते बांधण्यात आले. ८६.६१ कि.मी.साठी ४४ कोटी ५४ लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये आमगाव तालुक्यात जवळपास २४ किमीचे चार रस्ते तयार करण्यात आले. यासाठी ११ कोटी ७० लाख ४२ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. देवरी तालुक्यात १७ कोटी ५२ लाख ८० हजार रुपयाच्या रक्केमतून जवळपास ४० किमी पर्यंत आठ रस्ते तयार करण्यात आले. सालेकसा तालुक्यात ३१ किमीचे पाच रस्ते बांधण्यात आले. यासाठी १५ कोटी ४० लाख ८१ हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. २०१७-१८ या वित्त वर्षात ३४ कोटी २२ लाख ७८ हजार रुपये निधी खर्च करुन जवळपास ५८ किमीचे १८ रस्ते तयार करण्यात आले. यामध्ये आमगाव तालुक्यात तीन रस्त्यासाठी १४ किमी बांधकामावर ८ कोटी ९७ लाख ३४ हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. देवरी तालुक्यात ३० किमीचे १० रस्ते बांधण्यात आले. यासाठी १७ कोटी ७९ लाख ८७ हजार रुपये खर्च करण्यात आले. सालेकसा तालुक्यात ७ कोटी ५७ हजार एवढ्या निधीतून १३ किमीचे पाच रस्ते बांधण्यात आले. असे एकूण ३४ रस्त्यांचे बांधकाम मागील दोन वित्त वर्षात करण्यात आले.
२०१९ पर्यंत ३०० गावांना जोडणार
सालेकसा, देवरी या तिन्ही तालुक्यातील दिडशे गावांना राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाना थेट जोडण्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु असून ते २०१९ पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या दिड वर्षात आणखी दिडशे गावांना जोडण्याच्या दिशेने काम सुरु आहे. येत्या दोन वर्षात प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आवश्यक निधी मिळणार असल्याचे आमदार पुराम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
चालू वित्त वर्षात २५ रस्त्यांना मंजुरी
२०१८-१९ या वित्त वर्षात आतापर्यंत २५ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजुरी मिळाली आहे. यात आमगाव तालुक्यात जवळपास १४ किमीचे आठ रस्ते, देवरी तालुक्यात ३२ किमीचे १२ रस्ते आणि सालेकसा तालुुक्यात १६ किमी पर्यंत पाच रस्ते तयार करण्यात येणार आहे. तिन्ही तालुक्यात एकूण ६१ किमी रस्ते तयार करण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण झाल्यास मागील दोन वर्षात जवळपास २१२ किमी रस्ते बांधणीचे काम पूर्ण होणार आहे. आमगाव तालुक्यातील ३३ गावे, देवरी तालुक्यातील ६८ गावे आणि सालेकसा तालुक्यातील ४७ गावे असे एकूण १४८ गावे महमार्गाला थेट जोडली जाणार आहे.

Web Title:  On one of the 150 villages of three talukas, on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.