दीड एकरातील धानाचे पुंजणे जळून खाक
By admin | Published: June 3, 2017 12:10 AM2017-06-03T00:10:45+5:302017-06-03T00:10:45+5:30
जवळच्या पानगाव (रामपुर) येथील शेतकरी सुखराम मन्साराम चौधरी यांच्या मालकीच्या शेतात रब्बी धानाचे पुंजणे गोळा करून ठेवले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : जवळच्या पानगाव (रामपुर) येथील शेतकरी सुखराम मन्साराम चौधरी यांच्या मालकीच्या शेतात रब्बी धानाचे पुंजणे गोळा करून ठेवले होते. १ जूनच्या रात्री धानाची मळणी करीत असतांना अचानक एका पुजण्याला आग लागली. या आगीत एक दिड एकरातील धानाचा पुंजना पूर्णपणे जळून स्वाहा झाला.
या घटनेत शेतकऱ्याचे ५० ते ६० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. आगीत मळणी करणाऱ्या मशिनीला सुध्दा आग लागल्याने मशिनचे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य जियालाल पंधरे, पोलीस पाटील मोहनसिंह बघेल, गुड्डू बिसेन यांनी शेतकरी सुखराम मन्साराम चौधरी यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.
तलाठी डोये यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा तयार केला. त्यात ५० हजार रूपयाचे नुकसान झाल्याचे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
सदर शेतकऱ्याला शेतकऱ्याला जिल्हा परिषदमधून नुकसान भरपाई मिळवून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे जि.प.सदस्य पंधरे यांनी सांगीतले आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.