दीड लाखांची दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:18 PM2018-11-28T22:18:58+5:302018-11-28T22:19:40+5:30

येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे घेऊन जात असताना दीड लक्ष रुपयांची दारु पकडली. ही कारवाई गोंदिया येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे अवैधरित्या दारु वाहून नेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

One and a half lakhs of alcohol caught | दीड लाखांची दारु पकडली

दीड लाखांची दारु पकडली

Next
ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : दोन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे घेऊन जात असताना दीड लक्ष रुपयांची दारु पकडली. ही कारवाई गोंदिया येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे अवैधरित्या दारु वाहून नेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास एस.एस.जे. महाविद्यालयानजीक नाकाबंदी करीत असतांना विशेष पथकाला एक चारचाकी वाहन दिसून आले. एमएच २०/बीएन-३६२६ या मारुती सुझूकी रिट्स कारमध्ये येथील बाजार चौकातून अवैधरित्या देशी दारु भरण्यात आल्याची गुप्त माहिती बातमीदाराने दिली होती.
या आधारावर वाहन थांबविण्यात आले. त्याची तपासणी केली असता सुमारे दीड लाख रुपयाची देशी दारु या वाहनात आढळून आली. यावरुन दिलीेप आसन्ना कुचनकार (३२) व मुकेश दामोधर दुपारे (२५) रा. वडसा जि.गडचिरोली यांना पकडण्यात आले. त्यांची विचारपूस केली असता ही दारु आंबेडकर वार्ड वडसा येथील अनिल माधोराव निमजे (२८) यांची असल्याचे त्यांनी सांगीतले. सदर दारु मलकाम अ‍ॅड ब्रदर्स देशी दारु दुकानाचा नोकरनामा असलेले मालक धर्मूकुमार कुदरुपाक्का यांचेकडून विकत घेतल्याचे सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली.
विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे यांचे फिर्यादीवरुन दिलीप कुचनकार, मुकेश दुपारे, अनिल निमजे व धर्मूकुमार कुदरुपाक्का या आरोपीविरुध्द म.दा. कायद्याच्या कलम ६५, ६५ई, ७७ अ तसेच भादंवि १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दारु वाहून नेणारी कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पो.उपनिरीक्षक महेंद्र शहारे, पोलीस हवालदार थेर, तुरकर, कावळे, पटले, बिसेन, बोपचे, रहांगडाले, मेश्राम, कुरसुंगे यांनी केली.

Web Title: One and a half lakhs of alcohol caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.