गाेंदिया,आमगाव तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:03 AM2021-09-02T05:03:01+5:302021-09-02T05:03:01+5:30
कोरोनाचा संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ३१७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २० नमुन्यांची आरटीपीसीआर २९७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात ...
कोरोनाचा संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ३१७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २० नमुन्यांची आरटीपीसीआर २९७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३ टक्के होता. कोराना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४४७०४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२७७५० नमुन्यांची आरटीसीआर तर २१९२९२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१२०२० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यापैकी ४०४९७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत दोन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी नागरिकांनी पूर्वी इतकी काळजी घेण्याची गरज आहे.
......
७६६१८५ नागरिकांचे लसीकरण
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ९० केंद्रांवरून प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. त्यातंर्गत ७६६१८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाचा पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ २५ टक्के आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
.......