श्रीकृष्ण गौरक्षण सभेसाठी एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:17 PM2018-04-01T22:17:03+5:302018-04-01T22:17:03+5:30

येथील एकमात्र गौसेवक संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत समाविष्ट करून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पिंडकेपार येथील श्रीकृष्ण गौरक्षण सभेच्या परिसराचा विकास, अतिरीक्त शेड व अन्य विविध विकास कामे करता येणार आहेत.

One crore rupees for Shrikrishna Gokshit Sabha | श्रीकृष्ण गौरक्षण सभेसाठी एक कोटी

श्रीकृष्ण गौरक्षण सभेसाठी एक कोटी

Next
ठळक मुद्देगोवर्धन-गौवंश सेवा केंद्र योजनेत समावेश : निधीतून गौशाळेचा होणार विकास

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील एकमात्र गौसेवक संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत समाविष्ट करून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पिंडकेपार येथील श्रीकृष्ण गौरक्षण सभेच्या परिसराचा विकास, अतिरीक्त शेड व अन्य विविध विकास कामे करता येणार आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाचे हे फलीत असल्यामुळे श्रीकृष्ण गौरक्षण सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
मागील वर्षी गोपाष्टमी निमित्त आयोजीत कार्यक्रमात आमदार अग्रवाल यांनी एक कोटींचा निधी मंजूर करवून देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्र्यांना निधी मंजूर करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. तसेच शासनाच्या गोवर्धन-गौवंश सेवा केंद्र या योजनेसंदर्भात पारित आदेश गौैरक्षण सभेचे सचिव राजेश व्यास व अध्यक्ष अजय अग्रवाल यांना देत यासाठी पशु संवर्धन उपायुक्तांमार्फत राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
पश्चात, आमदार अग्रवाल यांनी राज्याचे कृषी, पशु संवर्धन व दुग्ध विकास सचिव विजय कुमार यांच्याशी सतत संपर्क साधला. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या विषयाला घेऊन मौखीक व लिखीत माहिती दिली. ज्यावर मुख्यमंत्र्यांनी श्रीकृष्ण गौरक्षण सभेसाठी एक कोटींचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला व तसे आदेश ३१ मार्च रोजी काढण्यात आले आहे.
याबद्दल श्रीकृष्ण गौरक्षण सभेचे अध्यक्ष अजय अग्रवाल, सचिव राजेश व्यास, महावीर मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिताराम अग्रवाल, राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, नगरसेवक क्रांती जायस्वाल, रवी मुंदडा, श्रीनिवास मुंदडा, निरंजन अग्रवाल, ओमप्रकाश मुंदडा, विकास पारेख, विष्णू अग्रवाल, अ‍ॅड. राकेश वर्मा, कमल पुरोहीत, चुन्नी इसरका, अजय खंडेलवाल, अशोक अग्रवाल यांच्यासह अन्य गौसेवकांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करीत निधी मिळवून दिल्याबद्दल आभार मानले.

Web Title: One crore rupees for Shrikrishna Gokshit Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.