अरततोंडीवासीयांचा एक दिवस गावासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 09:52 PM2018-10-28T21:52:51+5:302018-10-28T21:53:38+5:30
जवळील ग्राम अररतोंडी येथील ग्रामपंचायतने गावची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी ‘एक दिवस गावासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत गावकऱ्यांनी अवघा दिवस गावच्या स्वच्छतेसाठी लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळील ग्राम अररतोंडी येथील ग्रामपंचायतने गावची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी ‘एक दिवस गावासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत गावकऱ्यांनी अवघा दिवस गावच्या स्वच्छतेसाठी लावला. यात गावातील महिला बचत गट उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते हे विशेष.
ग्रामपंचायतची कमान सांभाळणाºया सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर, ग्रामसेविका चित्रा बागडे यांनी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना आपल्या आरोग्याच्या फायद्यासाठी गावात स्वच्छता आवश्यक असल्याचे पटवून दिल्याने गावकºयांचा या उपक्रमात सक्रीय पाठींबा मिळाला. ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, महिला बचत गटाच्या कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी संपूर्ण एक दिवस दिला.
स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात फावडे व झाडू घेऊन गावातील मुख्य रस्ता, मंदिर परिसर, शाळा, ग्रामपंचायत इमारतीची साफसफाई केली. नाल्यातील गाळ काढणे, रहदारी रस्त्यावरील वाढलेले गवत व झाडांची कटाई करुन संपूर्ण गावाची साफसफाई केली. सर्वत्र स्वच्छता झाल्याने गावाचे रुपच पालटले.
या स्वच्छता मोहिमेत सरपंच तरोणे, उपसरपंच मुनेश्वर, ग्रामसेविका बागडे यांच्यासह सदस्य रामचंद्र रहेले, सत्वशीला कोसरे, अनिता बहेकार, मिनाक्षी कांबळे, आशा मुनेश्वर, संतोष खोटेले, पोलीस पाटील मधुकर तरोणे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनोद हत्तीमारे, शाळा समितीचे अध्यक्ष भागवत मुनेश्वर, बाजार समितीचे संचालक छगन पातोडे, ओमप्रकाश कोरे, पुरुषोत्तम ब्राम्हणकर, मोरेश्वर तरोणे, सुभाष तरोणे, भूमिका बारसागडे, शकु उके, रवि कोरे, ममता तरोणे, वच्छला तरोणे, विकास रहेले तसेच सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.