एका रुग्णाचा मृत्यू, २५ नवीन बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:38+5:302021-03-09T04:32:38+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पाय पसरत असल्याचे चित्र असून, वेळीच ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पाय पसरत असल्याचे चित्र असून, वेळीच सावध न झाल्यास जिल्हावासीयांना हे महाग पडू शकते. सोमवारी जिल्ह्यात २५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर, ११ बाधितांनी कोरोनावर मात केली. तर गोंदिया येथील ६२ वर्षीय रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या २५ बाधितांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव चार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आता सर्वच तालुक्यात कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र गोंदिया तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने हा तालुका आता कोरोनाचा हॉटस्पाॅट झाला आहे. आमगाव आणि तिरोडा तालुक्यातील रुग्णसंख्येतसुद्धा सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सजग होत कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ७४,२२६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६२,३६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ७०,५६० जणांचे नमुने तपासणी करण्यात आले, त्यापैकी ६४,३३३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,५७० कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,२१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १७३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
...........