चिरेखनी येथे ‘स्वच्छता एक सेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:04 AM2017-10-07T01:04:42+5:302017-10-07T01:04:55+5:30

तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात ‘स्वच्छता एक सेवा’ अभियानांतर्गत संपूर्ण ग्रामसफाई करण्यात आली. दरम्यान खंड विकास अधिकारी इनामदार,

'One service of cleanliness' | चिरेखनी येथे ‘स्वच्छता एक सेवा’

चिरेखनी येथे ‘स्वच्छता एक सेवा’

Next
ठळक मुद्देगुडमॉर्निंग पथकाची कारवाई : खंड विकास अधिकाºयांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
करटी : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात ‘स्वच्छता एक सेवा’ अभियानांतर्गत संपूर्ण ग्रामसफाई करण्यात आली. दरम्यान खंड विकास अधिकारी इनामदार, इतर अधिकारी व कर्मचाºयांनी गावाला भेट दिली.
स्वच्छता अभियानात पूर्व माध्यमिक शाळा चिरेखनी येथील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी ग्रामस्थांसह सहभागी झाले. या वेळी सरपंच, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी शासकीय सूचनांचा आदर करून कार्यात तत्परता दाखविली. स्वच्छता एक सेवा अभियानांतर्गत प्रात्यक्षिक कृती राबविण्यात आली. उघड्यावर शौचास बसणाºयांना १२०० रूपये दंड ठोकण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात खंड विकास अधिकारी इनामदार म्हणाले, उघड्यावर शौचास बसणाºयांवर मुंबई अधिनियम १९५१ अन्वये पोलीस कारवाईसह कडक शिक्षा करावी. गुड मार्निंग पथक सुरू करावे. रस्त्यावर घाण करणाºयांची गय करू नये. मलमूत्र घाणीमुळे भयंकर आजार पसरतात. घरोघरी शौचालय तयार करावे असे सांगू ते म्हणाले, माझे गुडमॉर्निंग पथक एक दिवस या गावात येणारच. उघड्यावर बसणाºयांवर मी स्वत: १२०० रूपये दंड ठोकून पोलिसांत तक्रार करणार, असे ते म्हणाले.
याप्रसंगी सरपंच जगन्नाथ पारधी, पाणलोट समितीचे सचिव भीवराम पारधी, रोजगार सेवक ठाकरे, लेखराज राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप ठाकरे, कृषी मित्र नंदराम पारधी, चैतलाल टेंभरे, इंदल बिसेन, श्यामराव पारधी, शंकर नेवारे, साहेबराव बिसेन, सोहनलाल शेंडे व परमात्मा एक सेवक मंडळाचे ५० च्या जवळपास सेवकांचा सहभाग होता.
ग्रामपंचायत कार्यालयात ‘संसार मे गांधी प्रगट भये, भारत का भार उतारने को’ हे गीत सादर करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सरपंच जगन्नाथ पारधी यांनी ग्राम स्वच्छतेवर मार्गदर्शन करून सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

 

Web Title: 'One service of cleanliness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.