फुके यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण गौरक्षण सभा संस्थेला एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:32 PM2018-04-01T22:32:48+5:302018-04-01T22:32:48+5:30

जिल्ह्यातील एकमेव अग्रणी गौवंश पालन संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने शासनाच्या गोवर्धन-गौवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत एक कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

One trillion rupees to Shrikrushna Gurkhakshan Sanstha Sanstha with the efforts of Phukke | फुके यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण गौरक्षण सभा संस्थेला एक कोटी

फुके यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण गौरक्षण सभा संस्थेला एक कोटी

Next
ठळक मुद्देश्रीकृष्ण गौरक्षण सभेला आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने शासनाच्या गोवर्धन-गौवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत एक कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील एकमेव अग्रणी गौवंश पालन संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने शासनाच्या गोवर्धन-गौवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत एक कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
उल्लेखनीय म्हणजे गौरक्षण सभा संस्थेत वार्षिक महोत्सव कार्यक्रमादरम्यान आ. परिणय फुके यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना गौवंश संवर्धनासाठी शासनाच्या गोवर्धन-गौवंश सेवा केंद्र योजनेच्या माध्यमातून मिळणारा एक कोटीचा निधी गोरक्षण सभेस मिळवून देण्याची मागणी केली होती. यावर आ. फुके यांनी मंचावरून सदर संस्थेस शासकीय योजनेंतर्गत एक कोटींचा अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फुके यांनी प्रस्ताव मागवून सदर प्रस्ताव पशु संवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत राज्य शासनाला पाठविला होता. यानंतर गौरक्षण सभा संस्थेला सदर एक कोटींचा निधी मंजूर झाला.
आ. फुके यांच्या प्रयत्नांमुळे गौशाळेला एक कोटींचा अनुदान मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष अशोक इंगळे व संस्थेचे राजेश व्यास, शिव शर्मा, कशिश जायस्वाल, भय्यूजी चौबे, लालू शर्मा आदींनी आभार मानले.

Web Title: One trillion rupees to Shrikrushna Gurkhakshan Sanstha Sanstha with the efforts of Phukke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.