सर्वसामान्यांना रडवतोय कांदा
By admin | Published: August 22, 2015 12:21 AM2015-08-22T00:21:48+5:302015-08-22T00:21:48+5:30
बाजारात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो तर लाल मिरची ११० रुपये किलो आहे. मिरची तिखट १६० रुपये किलो आहे.
४० ते ५० रुपये किलो कांदा : अवकाळी पावसाचा फटका
बाजारात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो तर लाल मिरची ११० रुपये किलो आहे. मिरची तिखट १६० रुपये किलो आहे. याउलट स्थिती साखरेची आहे. साखरेचे दर ३२ रूपयावरून घसरून २५ रूपयापर्र्यंत घसरले आहेत. यामुळे साखरेचा गोडवा आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
डाळी कडाडल्या..
४कडधान्य बाजार सर्वाधिक तेजीत आहे. यामध्ये पावसाळ्यात सर्वाधिक खरेदी होणाऱ्या डाळी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्या खरेदी करणेही अशक्य झाले आहे. सर्वाधिक विक्री तूर डाळीची होते.
तूर डाळीने १०० चा आकडा पार केला आहे. ७० रूपयांपासून ते ११० रूपयांपर्यंत तूर डाळ विकली जात आहे. उडीद डाळ १०० रुपये किलोच्या घरात आहे.
मूग डाळ ९० रुपये तर मूगाचा सोल १०० रूपयांच्या घरात आहे. मसूर डाळ ८० रुपये किलो आहे. हरभरा ६० रुपये, वटाना ५० रुपये तर बरबटी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे. सर्वांचेच भाव वाढले आहे.
गोंदिया : गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यातील दोन लाख टन कांदा सडला. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सर्वसामान्यांच्या भोजनाचा अविभाज्य घटक असलेला कांदा यावर्षी वाढीव दराने रडविणार आहे.
गत आठवड्यात ३० ते ३२ रुपये किलोच्या घरात असलेला कांदा या आठवड्यात ४० रूपयांपर्यंत वधारला आहे. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासोबतच बाजारात डाळींचे दरही कडाडले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
गतवर्षी लागवड करण्यात आलेला कांदा राज्यात वाया गेला. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात कांद्याचे दर चढले आहेत. ठोक बाजारात कांद्याचे दर ३० ते ३२ रुपये होते. चिल्लर बाजारात कांद्याचे दर ४० रुपये किलोच्या घरात राहीले. कांद्याच्या दरात झालेल्या दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.
बहुतांश नागरिकांनी उन्हाळ्यात कांद्याचा साठा करून ठेवला. २५ ते ५० किलोपर्यंत १० ते १५ रुपये किलो दरात कांद्याची खरेदी केली. आता हा साठा संपत आल्याने त्यांना ४० रुपये किलोच्यावर दराने कांद्याची खरेदी करावी लागणार आहे. कांद्यांचा भाव गगणाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. पुढे कांद्याचे भाव आणखी चढणार असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)