‘आग व सुरक्षा’ या विषयावर ऑनलाइन जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:27 AM2021-03-19T04:27:37+5:302021-03-19T04:27:37+5:30

गोंदिया : येथील बंधू विज्ञान महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे आणि अग्निशमन व आणीबाणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘आग व सुरक्षा’ या ...

Online awareness on 'Fire and Safety' | ‘आग व सुरक्षा’ या विषयावर ऑनलाइन जनजागृती

‘आग व सुरक्षा’ या विषयावर ऑनलाइन जनजागृती

Next

गोंदिया : येथील बंधू विज्ञान महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे आणि अग्निशमन व आणीबाणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘आग व सुरक्षा’ या विषयावर सोमवारी ऑनलाइन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविकातून इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. जयंत महाखोडे यांनी कोरोना महामारीच्या काळात आपल्याला घरी बसूनच ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकारचे शिक्षण घ्यायचे आहे. सुरक्षा संबंधांची माहिती घेऊन आपण स्वतःची व इतरांची सुरक्षा कशी करता येईल, यासंबंधी हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. याप्रसंगी अग्निशमन अधिकारी लोकचंद्र भंडारकर यांनी अग्निशमन विभागात उपलब्ध असलेले उपकरण व त्यासंबंधी माहिती देऊन नंतर प्रात्यक्षिक करून दाखविले. तर, बीएससी सेमिस्टर-३ चा विद्यार्थी मोहम्मद शेख याने नवीन टेक्नॉलॉजीचा आग विझवण्यासाठी कसा वापर करता येईल, यासंबंधी आपले मत मांडले. संचालन डॉ. महाखोडे यांनी केले. आभार बीएससी सेमिस्टर-५ ची विद्यार्थिनी व्टिंकल पारधी हिने मानले. कार्यक्रमात १०९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी डी.जी. नालमवार, ए.ए. भोयर, भाविक राठोड, सुरेंद्र सहारे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Online awareness on 'Fire and Safety'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.