ऑनलाईन स्पर्धांचे पुरस्कार वितरित ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:24+5:302021-08-18T04:34:24+5:30
गोंदिया : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती व महिला मंच यांच्यावतीने कोविड लाॅकडाऊन काळात घेण्यात आलेल्या ऑनलाईन विविध ...
गोंदिया : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती व महिला मंच यांच्यावतीने कोविड लाॅकडाऊन काळात घेण्यात आलेल्या ऑनलाईन विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण समारंभ सोमवारी (दि.१६) पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला.
महिला मंच अध्यक्षा प्राजक्ता रणदिवे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी एन. जे. सिरसाटे, एस. जी. वाघमारे, एन. एम. मेश्राम, केंद्र प्रमुख निशा बोदेले, संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा दमयंती वैद्य प्रामुख्याने उपस्थित होत्या. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन व कोरोना काळात मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षिका, आप्तस्वकियांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोविड काळात जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिकांकरिता देशभक्ती गीतगायन, ‘महिला सशक्तीकरण’ याविषयावर निबंध, थोरपुरुषांवर एकपात्री नाट्य, भावगीत गायन व प्रश्नमंजुषा स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर सावित्रींचा’ हा ऑनलाईन कार्यक्रम घेतला आणि त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व आकर्षक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक स्पर्धेकरिता प्रोत्साहनपर व सर्व सहभागी शिक्षिकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन संगीता घासले यांनी केले. प्रास्ताविक मंचच्या सचिव जयश्री निलकंठ सिरसाटे यांनी केले. आभार सल्लागार रेखा बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी सरिता वऱ्हाडे, गद्देवार, उषा भोयर, वैशाली चौधरी, राजानंद वैद्य, हरिराम येरणे, नेतराम बिजेवार, बिसेन, प्रमोद बघेले यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.