शाळाबाह्य बालकांवर गाजले ऑनलाईन कविसंमेलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:04+5:302021-04-20T04:30:04+5:30

गोंदिया : शाळाबाह्य बालक या विषयावर ऑनलाईन कविसंमेलन शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट वय असण्याची गरज नाही. फक्त मनात शिकण्याची जिद्द ...

Online Poetry Conference on Out-of-School Children () | शाळाबाह्य बालकांवर गाजले ऑनलाईन कविसंमेलन ()

शाळाबाह्य बालकांवर गाजले ऑनलाईन कविसंमेलन ()

Next

गोंदिया : शाळाबाह्य बालक या विषयावर ऑनलाईन कविसंमेलन शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट वय असण्याची गरज नाही. फक्त मनात शिकण्याची जिद्द आणि स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक जाणून घेणे आहे. शालेय शिक्षणाचा प्रारंभ हा मुलाच्या विकासाच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा असतो. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदी अन्वये ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे. गोंदिया जिल्ह्यात १,०२६ बालरक्षक व सर्व शिक्षण यंत्रणेच्या साहाय्याने शाळाबाह्य बालकमुक्त जिल्हा करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याला पाठबळ मिळावे यासाठी ऑनलाईन कविसंमेलन शिक्षण विभागाने घेतले.

शाळाबाह्य बालकांकरिता शासनस्तरावरून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजना व्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. शाळाबाह्य तसेच अनियमित विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यातील बालरक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास केला की आपोआपच त्यांच्या हातून विधायक गोष्टी घडत असतात. वयोगटातील बालकांना शिकवणाऱ्या शिक्षकांकडे विद्याव्यासंग लागतो. ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रयत्नशील आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात कवितेच्या माध्यमातून शाळाबाह्य बालक या विषयावर भावना व्यक्त करणाऱ्या कवींना ‘शाळेची वाट’ ऑनलाईन कविसंमेलन या नावीन्यपूर्ण उपक्रमातून एक संधी उपलब्ध करून दिली आहे. शाळाबाह्य बालकांना ज्ञानाच्या प्रकाशात आणतानाचे प्रयत्न, बालकांना शिक्षणाची गरज, बालकामगार व शिक्षण, शिक्षणाची संधी प्रत्येकाला, शाळेत जाणार अशा विविध विषयाला अनुसरून कविता करण्यात आल्या आहेत. या कविसंमेलनात जिल्हा समन्वयक कुलदीपिका बोरकर, सुनील ठाकूर, किरण कावळे, उमेश रहांगडाले, सुंदरसिंग साबळे, होलीराम जांभूळकर, विजय फुलबांधे, ममता पटले, डी.एन. गोलीवार, सी.एच बिसेन, निखिलेशसिंह यादव, योगेश्वरी पटले, उमा गजभिये, खुमेशककुमार कटरे, संतोष पारधी, यज्ञराज रामटेके, सत्यवान गजभिये, प्राजक्ता रणदिवे, जयश्री सिरसाटे, देवीदास हरडे यांनी भाग घेतला होता.

बॉक्स

सत्रात तीनदा शाळाबाह्य शोधमोहीम

गोंदिया जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये तीन वेळा शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली आहे. ९ ते ११ डिसेंबर २०२० ला अस्थायी कुटुंबातील बालकांची वीटभट्टीवरील विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. ५ ते १५ मार्च २०२१ ला शासन निर्णयानुसार सर्व शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली आहे. या शोध मोहिमेमध्ये तालुका बालरक्षक समन्वयक देवीदास हरडे यांनी तिरोडा तालुक्यामध्ये ९ मार्चला बालकामगार बालकांची एक दिवसाची विशेष शोध मोहीम राबवून विशेष उपक्रम तिरोडा तालुक्यामध्ये बालकामगार बालकांचा शोध घेतला.

Web Title: Online Poetry Conference on Out-of-School Children ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.