‘उठता बसता भाग-३’ या ई-पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:30+5:302021-06-28T04:20:30+5:30

आमगाव : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून भोसा शाळेचे सहायक शिक्षक जैपाल ठाकूर यांनी ...

Online publication of the e-book 'Uthta Basata Part-3' () | ‘उठता बसता भाग-३’ या ई-पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन ()

‘उठता बसता भाग-३’ या ई-पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन ()

googlenewsNext

आमगाव : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून भोसा शाळेचे सहायक शिक्षक जैपाल ठाकूर यांनी सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नांचे संकलित केलेल्या ‘उठता बसता भाग ३’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या हस्ते शनिवारी (दि.२६) ऑनलाइन करण्यात आले.

यावेळी डायटचे कातुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख जे. डी. मेश्राम, इंग्रजी विषय सहायक सुनील हरिणखेडे, भोसा शाळेचे मुख्याध्यापक ए.एस.रावते, कातुर्ली शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अंबर बिसेन, मोहगाव शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एल.महारवाडे, सी.जे.बन्सोडे, विकास लंजे, डी.टी.गिर्हेपुंजे, एन. एच. कटरे, मुनेश रहांगडाले, अनमोल रहांगडाले, ओम चौधरी उपस्थित होते. या उपक्रमाचे संकलनकर्ता जैपाल ठाकूर हे दररोज विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञानावर आधारित पाच प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी करीत असून, ते अत्यंत उपयुक्त आहे. हे कार्य त्यांनी अविरत सुरू ठेवावे, असे प्रतिपादन राजकुमार हिवारे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम सर यांनी उठता बसता या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय धुर्वे यांनी केले तर आभार आर.एम.बोपचे यांनी मानले.

Web Title: Online publication of the e-book 'Uthta Basata Part-3' ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.