ऑनलाइन त्रैमासिक अहवाल आस्थापनांना बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:29 AM2021-03-17T04:29:55+5:302021-03-17T04:29:55+5:30

ज्या आस्थापनांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांनी त्रैमासिक अहवाल (ई.आर-१) विवरणपत्रे नियमितपणे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची दक्षता घ्यावी, तसेच ...

Online quarterly report binding to establishments | ऑनलाइन त्रैमासिक अहवाल आस्थापनांना बंधनकारक

ऑनलाइन त्रैमासिक अहवाल आस्थापनांना बंधनकारक

Next

ज्या आस्थापनांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांनी त्रैमासिक अहवाल (ई.आर-१) विवरणपत्रे नियमितपणे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची दक्षता घ्यावी, तसेच ज्या आस्थापनांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या वेबसाइटवर तात्काळ ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. कौशल्य विकास विभागाच्या वेबपोर्टलवरील आस्थापनेची संपूर्ण माहिती अद्ययावत करावी. ज्या आस्थापनांची माहिती अद्ययावत नाही त्यांनी विभागाची माहिती तात्काळ अद्ययावत करावी. कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्यास कायद्यातील नियम ७ नुसार आस्थापना प्रमुखाविरुद्ध फौजदारी अदखलपात्र खटला न्यायालयात दाखल करण्यात येईल. आस्थापनांनी आपल्या स्तरावरील कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्तांनी कळविले आहे.

Web Title: Online quarterly report binding to establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.