तलावांत केवळ १०.२८ टक्के पाणी
By Admin | Published: April 18, 2015 12:41 AM2015-04-18T00:41:07+5:302015-04-18T00:41:07+5:30
जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. ..
पाणीसाठ्यात घट : मागील वर्षी होते ३२.१६ टक्के पाणी
गोंदिया : जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. मागील एक ते दोन आठवड्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस येत आहे. तरीही जलाशय-तलावांतील पाण्याचे स्तर एवढे कमी झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आजच्या तारखेत ३२.१६ टक्के जलसंग्रह होते.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चार जलाशयांतही पाणी संग्रहाची स्थिती बिकट आहे. कालीसरार जलाशय तर अनेक महिन्यांपूर्वीच आटले आहे. इटियाडोह जलाशयात २७.४४ टक्के, सिरपूर जलाशयात १८.९३ टक्के व पूजारीटोला जलाशयात २१.३८ टक्के जलसंग्रहाची स्थिती आहे.
मध्यम प्रकल्पाच्या तलावांपैकी तीन तलावांची स्थिती गंभीर आहे. त्यांत एक टक्कासुद्धा पाणी उरले नाही.
मध्यम प्रकल्पाच्या बोदलकसा जलाशयात ५.५३ टक्के, चोरखमारा जलाशयात ०.८७ टक्के, चुलबंदमध्ये ६.४० टक्के, खळबंदामध्ये १०.६३ टक्के, मानागडमध्ये ११.७४ टक्के, रेंगेपारमध्ये ०.२८ टक्के, संग्रामपूरमध्ये पाणी लघुत्तम पातळीच्या खाली आहे. मध्यम प्रकल्पाच्या सात तलावांत पाण्याचा साठा केवळ ५.६१ टक्के आहे. उमरझरी येथे १७.४४ टक्के, कटंगी येथे १७.९५ टक्के, कलपाथरी येथे १६.९७ टक्के जलसाठ्याची स्थिती आहे.
लघू प्रकल्पाच्या १९ तलावांत एकूण १३.५१ टक्के पाणी उरले आहे. आक्टीटोला येथे १०.०१ टक्के, भदभद्या येथे १४.०१ टक्के, डोंगरगाव येथे १.९८ टक्के, कालीमाटी येथे २.१५ टक्के, मोगर्रा २७.४६ टक्के, नवेगावबांध १९.३० टक्के, पिपरिया २२.६५ टक्के, पांगडी ०.८९ टक्के, रेहाडी १४.४३ टक्के, राजोली १०.८६ टक्के, रिसाला २.२२ टक्के, सोनेगाव १.६८ टक्के, सालेगाव ९.७५ टक्के, शेरपार ७.०७ टक्के, जुनेवानी ११.६३ टक्के, गुमडोह, हरी, शेळेपार व वडेगाव येथील तलावांत पाण्याची टक्केवारी लघुत्तम स्तरापर्यंत पोहोचली आहे. ओवारा तलावात १६.९८ टक्के पाणी उरले आहे.
जुन्या मालगुजारी तलावात फुलचूर ६.४७, गोठणगाव १२.७५, गिरोला ४.२७, गंगेझरी ६.००, कवठा २०.४५, कोहलगाव १८.९०, खैरी ०.९७, खमारी १०.३५, कोसमतोंडी ११.९५, कोकणा १६.९६, खोडशिवनी ९.००, खाडीपार ०.६३, लेंडेझरी १९.०५, माहुली १.६१, मालीजुंगा १.८२, मेंढा ६.५३, मोरगाव ४.४४, माहुरकुडा ९५.१०, निमगाव ३.३४, नांदलपार ११.८१, पळसगाव (सौंदड) ६.२२, पुतळी ४७.७८, सौंदड तलावात ३१.११ टक्के पाणी उरले आहे. भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना-बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाळी, धाबेटेकडी, कोसबी-बकी, ककोडी, काटी, मुंडीपार, पालडोंगरी, पळसगाव-डव्वा, तेढा व ताडगाव येथे जलसाठा लघुत्तम स्तरापेक्षा खाली गेला आहे. स्थानिक पातळीवरील छत्तरटोला, सालेकसा (नर्सरी) व चारभाटा येथेसुध्दा लघु सिंचन प्रकल्पांतर्गत पाणी समाप्त झाले आहे. (प्रतिनिधी)