केवळ ३७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:05+5:302021-06-16T04:39:05+5:30
मंगळवारी (दि.१५) जिल्ह्यात १४ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ३ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सलग सहाव्या दिवशी एकाही ...
मंगळवारी (दि.१५) जिल्ह्यात १४ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ३ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सलग सहाव्या दिवशी एकाही बाधिताचा कोरोनाने मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १८१७७६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १५६४१७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १८८१२६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १६७१९७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१०५० कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी ४०२४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ११२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ३४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...........
मंगळवारचा पाॅझिटिव्हिटी रेट ०.११ टक्के
काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी एकूण २६९७ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ५६८ स्वॅब नमुन्यांची आरटीपीआर तर २१२८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात तीन नमुने कोरोना पाॅझिटिव्ह आले आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.११ टक्के आहे.
...................
सर्वाधिक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात
जिल्ह्यात सर्वाधिक ३५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहे. तर सर्वात कमी रुग्ण सडक अर्जुनी ३, देवरी तालुक्यात ४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. कोरोनाचा संसर्ग आता सर्वच तालुक्यात आटोक्यात असून पाच तालुक्यात रुग्ण संख्या ही १० ते २० च्या दरम्यान आहे.
...........
रिकव्हरी रेट ९८.०३ टक्केवर
कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा दुप्पट आहे. त्यामुळेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ११२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.०३ टक्के आहे. तर मृत्यू दर १.६९ टक्के आहे.
...............