‘मुले वाचतील’ तरच ‘मुली वाचणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:23 PM2017-11-03T23:23:00+5:302017-11-03T23:23:13+5:30

मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही.

'Only children will survive' if girls will read ' | ‘मुले वाचतील’ तरच ‘मुली वाचणार’

‘मुले वाचतील’ तरच ‘मुली वाचणार’

Next
ठळक मुद्देसाधना भारती : ‘बेटा बचाव राष्टÑीय अभियानांतर्गत मोर्चा व धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही. आज मुले व्यसनाच्या आहारी जाऊन आपले शरीर, मन व जीवनच उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे मुलींचे जीवन नष्ट होत असून मुलांना व्यसनापासून वाचविणे अत्यावश्यक झाले आहे. मुले वाचतील तरच मुली वाचणार, असे प्रतिपादन बेटा बचाव राष्टÑीय अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बासिडर साधना भारती यांनी केले.
येथील उपविभागीय कार्यालयासमोर आयोजीत धरणे आंदोलनात शुक्रवारी (दि.३) बेटा बचाव राष्टÑीय अभियानाची माहिती देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने बेटा बचाव राष्ट्रीय अभियानाचे अध्यक्ष ईश्वर उमरे, प्रवक्ता शिव नागपुरे, मंजू बैरागी, सरिता वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, महेंद्र बघेले व इतर उपस्थित होते.
पुढे बोलताना भारती यांनी, आजच्या काळात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळते. मात्र शासन व्यसनबंदीकडे दुर्लक्ष करीत आहे. शासन कोणत्याही पक्षाचे असो, व्यसनाशेमुळे समाज व महिलांचा काहीही लाभ होत नाही. व्यसनांमुळे मुलांचा मृत्यू होत असतानाही शासन या विषयावर कठोर पाऊल उचलत नाही. देशात ९० टक्के गुन्हे व्यसनांमुळे होतात. मुली व महिलांवर अत्याचार, बलात्कार, घटस्फोट, विधवा आदी प्रकाराला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगीतले.
विशेष म्हणजे, या आंदोलनांतर्गत शहरात रॅली काढण्यात आली होती. शहरातील बाजारभागासह मुख्य मार्गाने निघालेल्या या रॅलीत महिलांसह मोठ्या संख्येत विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या.
दिल्ली येथे आंदोलनाचा इशारा
बेटा बचाव राष्टÑीय अभियानाची रूपरेखा व्यक्त करताना साधना भारती म्हणाल्या, अभियानाच्या सुरूवातीला आम्ही महाराष्टÑ, मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेश या चार राज्यात सदर अभियान राबवित आहोत. त्यातही सुरूवातीला महाराष्टÑातील गोंदिया व नागपूर तर मध्य प्रदेशातील बालाघाट व शिवनी या चार जिल्ह्यांमध्ये बेटा बचाव राष्टÑीय अभियानांतर्गत विराट रॅली व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना व्यसनमुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात येतील व सर्वदलीय बैठक संसदेत आमंत्रित करण्याची मागणी केली जात आहे. तसेच गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. जर शासनाने २६ जानेवारी २०१९ पर्यंत संपूर्ण व्यसनांवर बंदी लावली नाही तर दिल्ली येथे जंतर मंतर परिसरात नशाबंदीसाठी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा दिला.

Web Title: 'Only children will survive' if girls will read '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.