वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:09+5:302021-04-27T04:30:09+5:30

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग हा वृत्तपत्रांमुळे होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुद्धा वृत्तपत्रांमुळे ...

The only illusion that newspapers cause corona | वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रमच

वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रमच

Next

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग हा वृत्तपत्रांमुळे होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुद्धा वृत्तपत्रांमुळे कोरोनाची लागण होत नसून, वृत्तपत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनामुक्त असल्याचे सांगितले आहे. वृत्तपत्रांच्या छपाईदरम्यान त्यावर सॅनिटायझेशन केले जाते. वृत्तपत्र विक्रेते देखील सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्यापासूनसुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो, हा केवळ भ्रम आहे. खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र घरी मागवून वाचन करावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो, हा केवळ आणि केवळ भ्रम आहे, असे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

जगभरात आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती ही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मिळत असते. लॉकडाऊनच्या काळात ‘लोकमत’ने अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. वर्तमानपत्र नियमित वाचावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही, हे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावरून फेक न्यूज जास्त येतात. परंतु वृत्तपत्र सत्य बातम्या देण्याचे काम करून समाजात जनजागृती करण्याचे काम करते. कोरोनाच्या काळातही सेवा देणारे वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत मोडले. वृत्तपत्र वाचनामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही. त्यामुळे मनात कुठलीही भीती न बाळगता वृत्तपत्रांचे वाचन करावे.

- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया.

छपाई आणि वितरणादरम्यान वृत्तपत्र योग्यरीतीने हाताळले जातात. त्यांचे सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण केले जाते. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही. जगात आतापर्यंत वृत्तपत्रांमुळे कोरोना झाल्याचे ऐकिवात नाही. वृत्तपत्र हे पूर्णपणे सुरक्षित असून, ती वाचल्यामुळे अथवा हाताळल्यामुळे कोरोना होतो, हा केवळ भ्रम आहे. याला कसलाही वैद्यकीय आधार नाही. ही बाब जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा स्पष्ट केली आहे. त्यामुळे कुठलाही संकोच व भीती न ठेवता बिनधास्तपणे वाचकांनी वृत्तपत्रांचे वाचन करावे. मीसुद्धा नियमित वृत्तपत्रांचे वाचन करतो. नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमित हातपाय स्वच्छ धुवावे, वारंवार साबणाने हात धुवावेत.

- विजय रहांगडाले, आमदार

समाजातील सर्वच घडामोडींचे वास्तव चित्रण मांडणारे वृत्तपत्र समाजापर्यंत अचूक बातम्या पोहचवितात. कोरोना विषाणूचा संसर्ग होताच अनेकांनी वृत्तपत्र बंद केले. परंतु कोरोना वृत्तपत्रांमुळे होत नाही तर अधिकाधिक लोकांच्या संपर्कात आल्याने होतो. कोरोनाला हरविण्यासाठी सगळ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. तसेच नियमित वृत्तपत्रांचे वाचन करावे. वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही.

- किशोर डोंगरवार, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

वृत्तपत्रांमुळे कोरोना झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे सत्य, अचूक आणि सविस्तर बातम्यांसाठी वृत्तपत्रांचाच वापर करावा. वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांनी तोंडाला मास्क लावावे. सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. आपण सर्वांनीसुद्धा काळजी घ्यावी. घरी राहा, सुरक्षित राहा.

- डॉ. अनुराग बाहेकर, हृदयरोग तज्ज्ञ गोंदिया

वृत्तपत्र अचूक माहिती देते. सोशल मीडियावरून अफवा जास्त पसरविल्या जातात. त्यामुळे समाजात आजही वृत्तपत्रे हे विश्वासार्ह माध्यम आहे. वृत्तपत्रातून वाचकांना सविस्तर बातमी कळते. लॉकडाऊनच्या काळात मी स्वत: वृत्तपत्रच वाचले आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना होत नाही, त्यामुळे सगळ्यांनी वृत्तपत्र वाचावे.

- डॉ. अंजन नायडू, प्राचार्य डी. बी. सायन्स महाविद्यालय

Web Title: The only illusion that newspapers cause corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.