माताच घडवू शकते घराघरांत शिवाजी (शिवाजी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:55 AM2021-02-21T04:55:00+5:302021-02-21T04:55:00+5:30

शेंडा-कोयलारी : शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यात महिलांचा आदर केला. त्यांच्या कारभारात महिलांना विशेष मानसन्मान मिळत होता. त्यांच्या राजदरबारात कधीही ...

Only mother can make Shivaji in the house (Shivaji) | माताच घडवू शकते घराघरांत शिवाजी (शिवाजी)

माताच घडवू शकते घराघरांत शिवाजी (शिवाजी)

Next

शेंडा-कोयलारी : शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यात महिलांचा आदर केला. त्यांच्या कारभारात महिलांना विशेष मानसन्मान मिळत होता. त्यांच्या राजदरबारात कधीही नृत्यांगना दिसल्या नाहीत. परस्रीला ते मातेसमान मानत होते. माता जिजाऊंनी बालपणापासून त्यांच्यावर सुसंस्कार टाकले होते. शिवरायांनी जगाला स्वराज्याचा विचार दिला. त्याग बलिदान आणि मातृत्वाचा आदर हा विचार राष्ट्रउभारणीसाठी आजही कामी येत आहे. असे शिवाजी माताच घराघरांत घडवू शकते, असे प्रतिपादन प्राचार्य एच.के.किरणापुरे यांनी केले.

येथील शासकीय आश्रमशाळेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ए.डब्ल्यू. भुरे, अधीक्षक पानपाटील, अधीक्षिका कांबळे व शिक्षक खेडकर उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रमाता माॅं जिजाऊ व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक खेडकर यांनी केले. आभार शिक्षिका शेंडे यांनी मानले.

Web Title: Only mother can make Shivaji in the house (Shivaji)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.