केवळ एका कोरोनाबाधिताची नोंद, संसर्ग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:46+5:302021-07-11T04:20:46+5:30
गोंदिया : कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट हाेत असून, संसर्ग आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. शनिवारी (दि.१०) जिल्ह्यात केवळ ...
गोंदिया : कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट हाेत असून, संसर्ग आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. शनिवारी (दि.१०) जिल्ह्यात केवळ १ बाधिताची नोंद झाली तर ६ बाधितांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णाची संख्या आता २८ वर आली आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी १५५५ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३२८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १२२६ नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.६ टक्के आहे. मागील आठ दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येला उतरती कळा लागली आहे, तर बाधितांच्या मृत्यूला सुद्धा पूर्णपणे ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २०५०९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १९८६०४ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २१९६८२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९८६०४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४११६५ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ४०४३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत २८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ४५३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.२३ टक्क्यांवर
बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२३ टक्क्यांवर पोहचला आहे. तो राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी समाधानकारक बाब आहे.