८५७ नमुन्यांची चाचणी पॉझिटिव्ह केवळ दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:05+5:302021-07-10T04:21:05+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. ९) एकूण ८५७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४६६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ...
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. ९) एकूण ८५७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४६६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३९० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात २ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२४ टक्के आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सरासरी तीन चार रुग्ण असून कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर सुद्धा भर दिला जात आहे. आतापर्यंत ४ लाख ८५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आले. यामुळे देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत दररोज तीन हजारावर स्वॅब नमुन्यांची चाचणी केली जात आहे. त्यात चार ते पाच कोरोना बाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट देखील अर्ध्या टक्क्याच्या आत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात २ कोरोना बाधित आढळले तर दोन बाधितांनी मात केली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २,०४,०३५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,७८,६२३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत २,१९,५३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १,९८,४६२ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४,१,१६४ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०,४३० नमुने निगेटिव्ह आले आहे.
सद्यस्थितीत ३३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ३२४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...................
लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण हे शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र शासनाकडून लसींचा पुरेसा पुरवठा केला जात नसल्याने लसीकरण मोहिमेला वांरवार ब्रेक लागत आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे.