जिल्ह्यात केवळ दोन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:36+5:302021-08-17T04:34:36+5:30
कोरोना संसर्गाच्या साेमवारी (दि.१६) ४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट ...
कोरोना संसर्गाच्या साेमवारी (दि.१६) ४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.८३ टक्के आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात सध्या केवळ दोन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून तेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात आला असला तरी जिल्हावासीयांना पूर्वीइतकीच खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४२२६४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात २२३७२४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८५४६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४११९६ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली.
.........
६६६०५९ नागरिकांचे लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. त्यापैकी आतापर्यंत ६६६०५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ५२ टक्के आहे.
........
निर्बंध झाले आता पूर्णपणे शिथिल
कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आल्याने रविवारपासून कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहे. आता सर्वच दुकाने रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
..............