आव्हान समर्थपणे पेलण्याची किमया महिलांतच (महिला)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:26 AM2021-03-14T04:26:51+5:302021-03-14T04:26:51+5:30
बोंडगावदेवी : नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक विचार अंगी बाळगल्यास यशोशिखर गाठणे शक्य आहे. येणारे आव्हान समर्थपणे पेलण्याची ...
बोंडगावदेवी : नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक विचार अंगी बाळगल्यास यशोशिखर गाठणे शक्य आहे. येणारे आव्हान समर्थपणे पेलण्याची किमया महिलांमध्येच आहे, असे प्रतिपादन येथील सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केले. ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
ग्रामपंचायत सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, पोलीस पाटील मंगला रामटेके उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उषा पुस्तोळे, माया मेश्राम, निराशा मेश्राम, आंगणवाडी सेविका भामीना नेटीनकर, किरण खोब्रागडे, रीता मानकर, वर्षा राखडे, माजी ग्रा.पं.सदस्या दीपिका गजभिये, सुनंदा कोटरंगे, डॉ. नेवारे, ॲड. श्रीकांत बनपुरकर, अमरचंद ठवरे, ग्राविअ पी.एम.समरीत उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन व पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. निराशा मेश्राम यांनी कविता सादर करून महिला शक्तीचा गुणगौरव केला. उषा पुस्तोळे, बनपूरकर, ठवरे यांनी सुध्दा विचार व्यक्त केले. संचालन करून आभार सदस्य माया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी कर्मचारी राष्ट्रपाल ठवरे, भोजराज मेश्राम, विश्वास लोणारे यांनी सहकार्य केले.