मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:23+5:302021-01-17T04:25:23+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या मतदानासाठी जिल्ह्यात सर्वाधिक महिलांनीच मतदानाचा हक्क बजावण्यात सरशी घेतल्याचे दिसून ...

Only women can exercise their right to vote | मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांचीच सरशी

मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांचीच सरशी

googlenewsNext

गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या मतदानासाठी जिल्ह्यात सर्वाधिक महिलांनीच मतदानाचा हक्क बजावण्यात सरशी घेतल्याचे दिसून आले. या मतदान प्रक्रियेत १२६११४ महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर १२५६०४ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. म्हणजेच, पुरुषांच्या तुलनेत तब्बल ५१० महिलांनी मतदान प्रक्रियेप्रती आपली जागरूकता दाखवून दिली.

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यातील आठ ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने उरलेल्या १८१ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ७९.८३ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून गावकारभाऱ्यांची निवड करण्यात आपला रस दाखविला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांनी गावस्तरावरील राजकारणाप्रती त्या जास्त जागरूक असल्याचे दाखवून दिले. त्याचे असे की, निवडणुकीत १२६११४ महिला मतदारांनी, तर १२५६०४ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच, पुरुषांच्या तुलनेत ५१० महिला मतदारांची संख्या जास्त दिसून आली. आठ तालुक्यांत घेण्यात आलेल्या या निवडणुकीत सर्वाधिक मतदान आमगाव तालुक्यात ८३.१३ टक्के एवढे नोंदविण्यात आले आहे. येथे १३३८२ महिलांनी, तर १३०५६ पुरुषांनी असे एकूण २६४३८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला असून, त्याची ८३.१३ एवढी टक्केवारी आहे. सर्वात कमी मतदान ७७.५२ टक्के देवरी तालुक्यात नोंदविण्यात आले आहे. येथे १२८७९ महिला, तर १२८४२ पुरुषांनी असे एकूण २५७२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्याची ७७.५२ एवढी टक्केवारी आहे.

----------------------------------

फक्त तिरोडा तालुक्यातच पुरुषांचा पुढाकार

जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत अधिक ५१० महिलांनी मतदानाचा हक्क बजावून आम्हीच पुढे असल्याचे दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यांत ही स्थिती दिसून येत आहे. मात्र, एकमेव तिरोडा तालुक्यात विपरीत स्थिती दिसून आली आहे. तिरोडा तालुक्यात १८ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत पुरुषांनी आघाडी घेतली आहे. येथे ९५७२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असतानाच त्यांच्या पुढे जात ९७४४ पुरुषांनी मतदान केले आहे. म्हणजेच, महिलांच्या तुलनेत १७२ पुरुष मतदारांची संख्या जास्त दिसून आली आहे.

----------------------------

महिला-पुरुष मतदारांचा तक्ता

Web Title: Only women can exercise their right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.