शहरात रुजतेय ‘ओपन बार’ संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:02 PM2018-11-24T22:02:44+5:302018-11-24T22:03:14+5:30

शहर आणि ग्रामीण भागातील अवैध धंदे बंदे करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मात्र दुसरीकडे शहरातील काही भागात सर्रापणे सट्टा व अवैध दारु विक्री सुरू आहे.

The Open Bar culture in the city | शहरात रुजतेय ‘ओपन बार’ संस्कृती

शहरात रुजतेय ‘ओपन बार’ संस्कृती

Next
ठळक मुद्देमद्यपींच्या त्रासाने प्रवासी त्रस्त : कारवाईकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहर आणि ग्रामीण भागातील अवैध धंदे बंदे करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मात्र दुसरीकडे शहरातील काही भागात सर्रापणे सट्टा व अवैध दारु विक्री सुरू आहे. तर दारु दुकानातून दारु खरेदी करुन रस्त्यालगत असलेल्या ठेल्यांवर मद्यपी सर्रासपणे पीत आहे. यामुळे शहरात ओपन बार संस्कृती रुजत असल्याचे चित्र आहे.
शहरातील रेल्वे स्थानक परिसर आणि काही मुख्य चौकांमध्ये ठेल्यांवर सहज देशी, विदेशी दारु उपलब्ध आहे. बार आणि दारू दुकानांमध्ये जाऊन दारु पिल्यास चकन्याचा खर्च वाढतो. हा खर्च वाचविण्यासाठी मद्यपी वाईन शॉपमधून दारु घेवून हातठेल्यावर जाऊन उघड्यावर पितात. त्यामुळे शहरात एक प्रकारे ओपन बार संस्कृती रूजत असल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक अनुभव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात येतो. या मार्गावरुन जाणाºया रस्त्यालगतच उघड्यावर मद्यपी दारु पीत असल्याने त्याचा रेल्वे स्थानकाकडे जाणाºया महिला प्रवाशांना सुध्दा त्रास होत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही समस्या कायम आहे. मात्र प्रवाशी सुध्दा नसती भानगड नको म्हणून याकडे दुर्लक्ष करतात.केवळ रेल्वे स्थानक परिसरच नव्हे तर शहरातील काही चौकांमध्ये सुध्दा हा प्रकार पाहयला मिळतो. मात्र यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मद्यपींची हिम्मत वाढ असल्याचे चित्र आहे.
रेल्वे विभागाचे दुर्लक्ष
रेल्वे स्थानक परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे.मात्र अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या समस्येत वाढ होत असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
बंदच्या दिवशी सहज उपलब्ध
शासनाने सण व उत्सव आणि महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी दारु दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे.मात्र बंदच्या दिवशी मद्यपींन हातठेल्यांवर दारु सहज उपलब्ध होते. केवळ त्यासाठी अतिरिक्त मोजावे लागतात. त्यामुळे दारू दुकाने बंद ठेवण्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: The Open Bar culture in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.