कोसळलेल्या झाडांची खुलेआम कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:17 PM2017-09-22T23:17:43+5:302017-09-22T23:17:56+5:30
गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वनक्षेत्र निंबा येथील जंगलामध्ये १९ सप्टेंबर रोजी आलेल्या चक्रीवादळाने शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा (तेढा) : गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वनक्षेत्र निंबा येथील जंगलामध्ये १९ सप्टेंबर रोजी आलेल्या चक्रीवादळाने शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. सागवान, ऐन, बिजा, धावडा व इतर प्रजातींचे लाखो रुपयांचे झाडे कोलमडून पडली. परिणामी वन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गोरेगाव वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी व अधिकारी निद्रावस्थेमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये किंमती झाडे जंगल परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून जमीनदोस्त झाली आहेत. कित्येक झाडे कोलमडून पडली आहेत. या परिसरातील काही लोक आपल्या मर्जीनुसार पडलेली झाडे जंगलातून कापून नेत आहेत. परंतु वन कर्मचारी जंगलामध्ये गस्त न घालता गावातल्या पानठेल्यावर आपला दिवस काढून घरी परत जातात. पडलेल्या तसेच जीवंत झाडांची जोपासना करीत नाहीत. अशा बेजवाबदार निष्क्रीय वन कर्मचाºयांवर वरिष्ठ अधिकाºयांनी कारवाई करावी. तसेच पडलेल्या झाडांचे व चोरी गेलेल्या झाडांचे मूल्यांकन करुन शासन नियमाप्रमाणे संबंधित वन कर्मचाºयांकडून झाडांच्या किमतीची रक्कम वसूल करुन अशा निष्क्रीय बेजबाबदार वन कर्मचाºयांना निलंबित करावे. तसेच शासकीय वनसंपत्तीचे संरक्षण करण्याची मागणी गावकºयांकडून होत आहे.