ऑनलाइन पार्सल उघडताय; व्हिडीओ रेकॉर्डिंग नक्की करा !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:50 PM2024-05-17T15:50:36+5:302024-05-17T15:51:14+5:30

ग्राहकांनो सतर्क व्हा : ऑनलाइन खरेदी वाढल्याने फसवणुकीची शक्यता

Opening parcels online; Be sure to record the video! | ऑनलाइन पार्सल उघडताय; व्हिडीओ रेकॉर्डिंग नक्की करा !

Opening parcels online; Be sure to record the video!

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
आता ऑनलाइन साहित्य खरेदी करताना सावधानता बाळगा, नाही तर आपल्याला गंडा बसू शकतो? ऑनलाइन वस्तू मागविताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करूनच ऑनलाइन पार्सल उघडावे.

मोबाइलमध्ये असलेले विविध अॅप्स ऑनलाइन खरेदीचे दालन ग्राहकांपुढे उभे करीत आहेत; मात्र अशी खरेदी करताना ग्राहक म्हणून आपण अधिक सजग राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मागविण्यात आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ करणे गरजेचे आहे. जेणेकरून पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तू डॅमेज असतील तर ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड होईल. ऑनलाइन शॉपिंगचा मोह आता सर्वांनाच जडला आहे. परिणामी, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. अशात पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ तयार करणे विसरू नका.

जिल्ह्यात पार्सलमधून फसवणुकीची घटना नाही
■ ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून साहित्य मागविण्याचा मोह आता सर्वांनाच जडला आहे. सुरक्षित आणि सजग राहून शॉपिंग केल्यास ऑनलाइन खरेदीचे फायदे जास्त असल्याचा अनुभव अनेक जण सांगतात.
■ दुकानांमध्ये, मॉलमध्ये, होलसेल मार्केटमध्ये जाऊन एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहक दहा वेळा विचार करून पारखून खरेदी करतात. परंतु ऑनलाइन ■ ■ खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होते. जिल्ह्यात आतापर्यंत घटना घडल्या असल्या तरी त्या पुढे आल्या नाहीत.

फसवणूक झालीच तर...
■ ऑनलाइन खरेदी करताना आपण कोणत्या वेबसाइटवरून खरेदी करीत आहेत, याबाबत सतर्कता बाळगा.
■ ऑनलाइन खरेदी करताना काही समस्या आल्यास त्यांच्या निवारणासाठी काही यंत्रणा आहे का, याची खात्री ग्राहकांनी करून घेणे. अत्यावश्यक आहे.
■ विना खात्रीने ऑनलाइन खरेदी केल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसतो. याची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात करावी.

पार्सल फोडण्यापूर्वी ही घ्या काळजी
■ ऑनलाइन पार्सल मागविताना शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. त्यामुळे खरेदी करताना काही चूक झाल्यास आपण दिलेल्या रकमेचा घोळ होत नाही. ज्या कंपनीची वस्तू आपण खरेदी करणार आहात त्या कंपनीची ऑनलाइन खरेदीसंदर्भातील माहिती तपासून घ्यावी. त्यामुळे होणारी संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते.

नागरिकांनी सतर्क राहावे
सध्या विविध वेबसाईट ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. या वेबसाइट ई- कॉमर्सच्या नियमानुसार सुरू झाल्या आहेत. ऑर्डर केलेलेच साहित्य आले किवा नाही, हे आधी तपासून पाहणे आवश्यक आहे. 
- किरण रासकर, सायबर सेल प्रमुख, गोंदिया

Web Title: Opening parcels online; Be sure to record the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.