वैद्यकीय रुग्णालयातील संपूर्ण १५० बेड कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:34+5:302021-04-14T04:26:34+5:30
गोंदिया : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, येथील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करण्यासाठी ...
गोंदिया : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, येथील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५० बेडचे डीसीएचसी असून, त्यातले ८० बेड कार्यान्वित होते. उर्वरित ७० बेड कार्यान्वित करण्यात यावेत, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावर जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी लवकरच उर्वरित ७० बेड सज्ज होणार, असे आश्वासन दिले आहे.
कोरोना परिस्थितीत आमदार अग्रवाल यांनी जनतेसोबत सोशल मीडियामार्फत संवाद साधला असून, आवश्यक ती काळजी घेणे गरज असल्यास आणि अति महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पड़ा, घराबाहेर पडत असताना तोंडावर मास्क अवश्य घाला. शासनाद्वारे निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करा, असे आवाहन केले आहे.