अट्टल गुन्हेगारांसाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:10 AM2018-09-02T00:10:32+5:302018-09-02T00:11:11+5:30

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ हा उपक्रम सुरू केला. ३१ आॅगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत गोंदिया शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी हे आॅपरेशन चालविले.

'Operation All Out' for Atal Offenders | अट्टल गुन्हेगारांसाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’

अट्टल गुन्हेगारांसाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा उपक्रम : शोधमोहिमेत आठ गुन्हेगारांना अटक

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ हा उपक्रम सुरू केला. ३१ आॅगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत गोंदिया शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी हे आॅपरेशन चालविले. या आॅपरेशन दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी आठ अट्टल गुन्हेगारांना पकडले.
सद्या सणासुद्दीचे दिवस असल्यामुळे लोक रात्री उशीरापर्यंत बाहेर असतात. गणेशोत्सव तोंडावर आहे. या सण उत्सवाचा फायदा घेऊन घरफोडी, चोरी, दरोडा घालणारे गुन्हेगार आपल्या कार्याला पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतात. घरफोडी, चोरी, दरोडा या प्रकरणात ज्यांचा समावेश आहे. व ज्यांच्यावर ‘नॉन बेलेबल वारंट’ आहे अश्या लोकांची शोध मोहीम गोंदिया शहराच्या संपूर्ण भागात राबविण्यात आली. गोंदिया शहर, रामनगर, गोंदिया ग्रामीण या तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी रात्रभर ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले. पोलीस अधीक्षक हरिष बैजल, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे ठाणेदार मनोहर दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर,उपनिरीक्षक नितीन सावंत व ३६ पोलीस कर्मचाऱ्यांनी सावराटोली, दसखोली, गौतमनगर, छोटा गोंदिया, सुंदरनगर, संजयनगर हा परिसर पिंजून काढून आठ आरोपींना अटक केली. रामनगर पोलीसांनी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविली. गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार नारनवरे यांच्या नेतृत्त्वात रामनगर पोलिसांनी ही मोहीम राबविली. या तिन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांच्या मदतीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पाोलीस निरीक्षक रमेश गर्जे व कर्मचाऱ्यांनी रात्रगस्त घातली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयतीना ताब्यात घेतले. त्यातील एकाला रामनगर पोलिसांच्या तर दुसºयाला गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
आॅपरेशन आॅल आऊटमध्ये यांना केली अटक
आॅपरेशन आॅल आऊटमध्ये केलेल्या कारवाईत नॉन बेलेबल वारंट असलेल्यांना अटक करण्याची मोहीम चालविली. गोंदिया शहर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यात गौतमनगर गोंदिया येथील आकाश उर्फ पेंद्या सिलीप टेंभेकर (२१) याच्यावर तीन अटक वारंट होते. सावराटोली येथील दीप छोटू सिर्वो (२८) याच्यावर एक, गोविंदपूर संजयनगरातील राजाराम तिलकचंद पटले (६३) याच्यावर एक, सुंदरनगरातील नितेश रामदास ब्राम्हणकर (२६) याच्यावर एक, सावराटोलीच्या सुभाष वॉर्डातील मयूर संजय सांडेकर (२४) याच्यावर दोन, सुंदरनगरातील सुमित शिवचरण मेश्राम (२५) याच्यावर एक, गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथील पर्वत शिवाजी चचाने (२८) याच्यावर एक व मटन मार्केट येथील सुमित देवेंद्र माकबन (२१) याच्यावर एक अटक वारंट होता.
गुन्हेगारांवर बसणार वचक
शारिरीक व आर्थिक गुन्हेगारीवर वचक आणणयासाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ जिल्हाभरात राबविले जाणार आहे. सदरक्षणााय खलनिग्रहणायचा प्रत्यय या मोहीमेतून पोलिस विभाग देणार आहे. आता सण, उत्सवाला सुरूवात होणार असल्याने शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ग्रामीण भागातील महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम, ग्राम सुरक्षा दल, पोलीस मित्र यांच्या सहकार्याने पोलीस विभाग जिल्ह्याला शांततेतून समृध्दीकडे नेणार आहे.

Web Title: 'Operation All Out' for Atal Offenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.