अश्रूंची फुले करण्यासाठीच आॅपरेशन मुस्कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:29 PM2019-01-28T21:29:26+5:302019-01-28T21:29:42+5:30

आई वडीलांपासून भटकलेल्या, बेपत्ता झालेल्या किंवा अपरहण झालेल्या बालकांच्या शोधासाठी महाराष्ट्र शासनाने उचलेले पाऊल चिमुकल्यांना त्यांचे आईवडिलांजवळ जाता आले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविण्यासाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून राबविलेल्या या अभियानाला ‘आॅपरेशन मुस्कान’ असे नाव देण्यात आले, असे उदगार गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी काढले.

Operation smile to tear the tears | अश्रूंची फुले करण्यासाठीच आॅपरेशन मुस्कान

अश्रूंची फुले करण्यासाठीच आॅपरेशन मुस्कान

Next
ठळक मुद्देहरीश बैजल : आॅपरेशन मुस्कानच्या नायकांचा झाला सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आई वडीलांपासून भटकलेल्या, बेपत्ता झालेल्या किंवा अपरहण झालेल्या बालकांच्या शोधासाठी महाराष्ट्र शासनाने उचलेले पाऊल चिमुकल्यांना त्यांचे आईवडिलांजवळ जाता आले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविण्यासाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून राबविलेल्या या अभियानाला ‘आॅपरेशन मुस्कान’ असे नाव देण्यात आले, असे उदगार गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी काढले.
पदमपूर येथील उडाण बहुउद्देशिय विकास संस्था व यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पदमपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात प्रजासत्ताक दिनानिमीत्त आयोजित ‘आॅपरेशन मुस्कान’ या कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन आमगावचे खंडविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहकार नेते तथा राज्यस्तरीय लेखा समितीचे सदस्य प्रा. सुभाष आकरे उपस्थित होते. अतिथी म्हणून आमगावचे पं.स. उपसभापती जयप्रकाश शिवणकर, युरो सर्जन डॉ. नोव्हील ब्राम्हणकर, आहारतज्ज्ञ डॉ. मोसमी ब्राम्हणकर, रूपेशकुमार असाटी, यागेश असाटी, कमला असाटी, विकास अधिकारी अविनाश ठाकूर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, प्राचार्य राकेश रामटेके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, चंद्रकुमार हुकरे, सतीश असाटी, अनिल पाऊलझगडे, रामेश्वर तलमले, मुख्याध्यापक शरद उपलपवार, तायक्वांडोचे आंतरराष्ट्रीय पंच दुलीचंद मेश्राम, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, शालीकराम तलमले उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक बैजल पुढे म्हणाले की, गोंदिया जिल्ह्याच्या पोलीसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेल्या बालकांचा मोठ्या प्रमाणात शोध आतापर्यनत राबविलेल्या आठ आॅपरेशन मुस्कान अभियानाच्या माध्यमातून घेण्यात आला. या अभियानाला जोमाने राबवितांना पोलिस कर्मचाºयांनी बेपत्ता असलेल्या बालकांना शोधण्यासाठी जणू आपल्या बेपत्ता झालेल्या बालकाला शोध घेत आहोत असा भाव मनात ठेवून काम करा असे निर्देश दिले होते. एकंदरीत रेकार्डवरील व रेकार्ड व्यतिरिक्त बालके मिळाली आहेत असे सांगितले. उदघाटनपर मार्गदर्शन करताना खंडविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी या उपक्रमाची समाजात असलेली महती पटवून दिली. प्रा. सुभाष आकरे यांनीही मार्गदर्शन केले. अतिथींचे स्वागत राष्टÑसंत तुकडोजी महाराज लिखीत ग्रामगीता ग्रंथ भेट व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नरेश रहिले, सुनंदा हुकरे, रामभरोष चक्रवर्ती यांनी केले. आभार प्रा.अर्चना चिंचाळकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक नरेश येटरे, आशिष तलमले, नरेश बोहरे, सचिन तलमले, प्रेमानंद पाथोडे, सुनिल हुकरे, जीवन फुंडे, दीपक भांडारकर, रविकांत पाऊलझगडे, प्रिनल वंजारी, दिनेश गिºहेपुंजे, प्रदीप कावरे, आशिक वाढई, राकेश नेवारे, निलेश बोहरे, शंकर कोरे, प्रकाश बहेकार, गोविंद बहेकार, हिमालय राऊत, लोकेश आगाशे, संतोष भांडारकर, प्रिनल श्रीभाद्रे, दिनदयाल महारवाडे, विजय कोरे, अतूल फुंडे, शैलेश लक्षणे, राजू भेदे, नितेश नेवारे, लोकेश बोहरे, नितीन बोरकर, सुमीत गायधने, आकाश पटले, धीरज भांडारकर यांनी केले.
आॅपरेशन मुस्कानच्या या नायकांचा सन्मान
आॅपरेशन मुस्कान अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलिस जवांनाचा सत्कार करण्यात आला आहे. त्यात रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जयपाल चावके बक्कल नं.७५८, राऊत बक्कल नं. ९१, पोलीस उपनिरीक्षक ए.पी. सोनवने, गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक सांदीया सोमनवार, दवनीवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नायक संतोष शेंडे बक्कल नं. २२५, सालेकसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दिनेश पटले बक्कल नं. ८०७ यांनी आॅपरेशन मुस्कान आठ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

Web Title: Operation smile to tear the tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.