सलून व्यवसाय सुरू करण्याचे आदेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:54+5:302021-05-31T04:21:54+5:30
गोंदिया : मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यासह जिल्ह्यात वाढू लागला, त्यातच काही दिवसानंतर कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर सलून ...
गोंदिया : मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यासह जिल्ह्यात वाढू लागला, त्यातच काही दिवसानंतर कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर सलून व्यावसायिकांनी दुकान सुरू करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र २-३ महिन्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे पुन्हा नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उभा झाला आहे. यामुळे आता कोरोना संसर्गाची गती मंदावल्याने बाधितांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे सलून व्यावसायिकांना दुकान सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी गोंदिया जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक चन्ने यांच्यासह आम आदमी पक्षाचे विदर्भ कोषाध्यक्ष पुरुषोत्तम मोदी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.