सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 01:04 AM2018-09-06T01:04:03+5:302018-09-06T01:04:50+5:30
शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी केले.
बुधेवाडा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव व आत्मा यांच्या विद्यमाने आयोजित सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) सन २०१८-१९ अंतर्गत बुधेवाडा येथे ५० शेतकºयांचा गट स्थापन करुन त्या शेतकºयांना आत्मा व कृषी विभागामार्फत सेंद्रीय शेती संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक घनशाम चचाणे, कृषी सहायक भारती येवले उपस्थित होते. सेंद्रीय शेती प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकºयांना मार्गदर्शन करताना कोहाडे म्हणाले, दिवसेंदिवस शेतीस लागणाऱ्या खतावरील खर्च वाढत आहे.
रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीचे आरोग्य खालावले, पाणी दूषीत झाले तर वातावरणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. उत्पादीत शेतमाल विषयुक्त निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. यावर रामबाण उपाय सेंद्रीय शेती हे असल्याचे सांगून त्यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व, फायदे सेंद्रीय अन्नधान्याची मागणी, रासायनिक खते, औषधी यापासून होणारे दुष्परिणाम सांगीतले. तसेच यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाºया अनुदानाची माहिती दिली. घनशाम चचाणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दर्शनी अर्क, जीवामृत, बिजामृत कसे तयार करायचे ते प्रशिक्षणार्थ्यांना करुन दाखविले. कृषी सहायक भारती येरणे यानी सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी असल्याचे सांगितले.