विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 09:18 PM2017-10-11T21:18:29+5:302017-10-11T21:18:46+5:30

कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो.

Organic farming is reserved for poisonous food | विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

Next
ठळक मुद्देअभिमन्यू काळे : कमीतकमी कीटकनाशक व रासायनिक खताचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतातील उत्पादित मालातून दररोजच्या आहारात काही प्रमाणात विष खाण्यात येत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे धोके ओळखून शेतकºयांनी आता विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
अलिकडेच यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांचा शेतात वापर करताना झालेल्या विषबाधेतून काही शेतकºयांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कृषी केंद्र संघाच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम. चौरागडे, कृषी उपसंचालक अश्विनी भोपळे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदिकशोर नायनवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्ह्यात भातपीक हे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याचे सांगून काळे म्हणाले, भात पिकावर खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे, करपा यासारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिफारशीपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते.
तसेच निष्काळजीपणे कीटकनाशकांची हाताळणी केल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरिता अनेक जैविक कीटकनाशके, मित्रकीड संशोधित झालेल्या असून त्यांचा योग्य त्या वेळी वापर केल्यास अत्यंत कमी खर्चात कीड रोगावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच जमिनीचे आरोग्य, पिकांची गुणवत्ता व शेतकºयांचे आरोग्यसुध्दा सुदृढ ठेवता येईल, असे ते म्हणाले.
भात पिकाकरिता विविध कीडरोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम (खोडकिड्याकरिता), मेट्राहायसिअन निसोएमी (तुडतुड्याकरिता), कामगंध सापळे इत्यादीसारख्या जैविक नियंत्रकांचा वापर करावा. याशिवाय बेडूक संवर्धन केल्यास भातशेतीमध्ये खोडकिडा नियंत्रणाकरिता अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याचे संवर्धन देखील जिल्ह्याातील शेतकºयांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी केले.
यावेळी कृषी केंद्र संघटनेचे नितीन गुप्ता, अशोक गुप्ता, महेश पाचे, श्रीराम चंदानी, रामअवतार अग्रवाल, शैलेश जैन व राहुल सिंघानिया उपस्थित होते.
फवारणीवेळी काळजी घ्या
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात कमीत कमी कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर होईल. तसेच फवारणीबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा प्रचार-प्रसार कृषी सहायकांनी करावा. माय पोर्टलवरु न जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना कीटकनाशकांच्या वापराबाबत मोबाईलवर संदेश पाठवावे. आज कीटकनाशकांचा वापर शेतकºयांच्या जीवावर बेतला आहे, हे यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून लक्षात येते. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्रकिडीचा मोठ्या प्रमाणात नायनाट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Organic farming is reserved for poisonous food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.