शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:30 AM2018-09-27T00:30:58+5:302018-09-27T00:31:36+5:30

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम धामनगाव येथे स्थापन करण्यात आलेल्या अन्नपूर्णा सेंद्रिय शेती गटातील शेतकºयांचे दुसरे सेंद्रिय शेती प्रशिक्षण बुधवारी (दि.१९) घेण्यात आले. अध्यक्षस्थानी गायधने होते.

Organic Farming Training for Farmers | शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती प्रशिक्षण

शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देधामणगाव येथे कार्यक्रम : शेतकºयांना सेंद्रिय शेतीचे प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम धामनगाव येथे स्थापन करण्यात आलेल्या अन्नपूर्णा सेंद्रिय शेती गटातील शेतकºयांचे दुसरे सेंद्रिय शेती प्रशिक्षण बुधवारी (दि.१९) घेण्यात आले. अध्यक्षस्थानी गायधने होते. यावेळी आत्माचे राहूल सेंगर, सुषमा शिवणकर, सूर्यवंशी, जुन्या सेंद्रिय खताचे गटप्रमुख कैलाश बघेले व देवेंद्र येटरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ५० शेतकºयांची निवड करुन त्यांच्या ५० एकर शेतामध्ये तीन वर्षाकरिता सेंद्रिय शेतीचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना आत्मामार्फत विभिन्न प्रकारचे सेंद्रिय साहित्य पुरवून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असते. त्या निमित्ताने अग्निअस्त्र, ब्रम्हस्त्र तसेच जिवामृत बनविणे याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणामध्ये कैलाश बडोले, टेंभरे, जी. रहांगडाले, सूर्यवंश्ी, सुषमा शिवणकर, राहूल सेंगर यांनी शेतकºयांना आपले अनुभव व सेंद्रीय शेतीच्या विभिन्न बाबींवर भर टाकली. तसेच सेंद्रिय औषध बनविण्याच्या पद्धती सांगून कशाप्रकारे पिकाला कीड व रोगांपासून वाचविता येईल यावर मार्गदर्शन केले. संचालन संतोष पारधी यांनी केले. आभार सेंगर यांनी मानले.

Web Title: Organic Farming Training for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.