तिरोडा तालुक्यात सेंद्रिय भात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:02 PM2019-07-15T22:02:00+5:302019-07-15T22:02:52+5:30

शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मागील ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थितीत १० हजार शेतकरी सेंद्रिय धानाची लागवड करीत आहेत.

Organic rice cultivation in Tiroda taluka | तिरोडा तालुक्यात सेंद्रिय भात लागवड

तिरोडा तालुक्यात सेंद्रिय भात लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचा पुढाकार : उत्पादन वाढविणार, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मागील ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थितीत १० हजार शेतकरी सेंद्रिय धानाची लागवड करीत आहेत.
यावर्षी अदानी फाऊंडेशनतर्फे खरीप हंगामापूर्वी शेतकºयांमध्ये श्री पध्दतीने सेंद्रिय भात लागवडी संदर्भात जनजागृती व्हावी,यासाठी तिरोडा तालुक्यातील ६४ गावांमध्ये प्रचाररथच्या माध्यमातून अभियान राबविण्यात आले.
अदानी फाऊंडेशन, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवर श्री पद्धतीने सेंद्रिय पध्दतीने धान लागवडीचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, व अदानी फाऊंडेशनतर्फे कृषी स्वयंसेवकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना श्री पध्दतीने सेंद्रिय धान लागवडीचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न केले जात आहे.अदानी फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना गादी वाफे,रोवणी, सेंद्रिय खते, कीड नियंत्रके तयार करण्याचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण तसेच प्रती शेतकरी ४ किलो बियाणांचे वितरण १० हजार शेतकऱ्यांना करण्यात आले. श्री पध्दतीने सेंद्रिय धान पिकाची लागवड केल्यास, उत्पादन खर्च हा ३० टक्के कमी होत असून उत्पादनात हमखास वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याच्या उत्पन्नात भर पडते. यामुळे शेतकऱ्यांनी श्री पध्दतीने सेंद्रिय धानपिकाची लागवड करावी, असे अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. हा उपक्रम अदानी विद्युत प्रकल्पाचे स्टेशन हेड सी.पी.शाहू यांच्या मार्गदर्शनात राबविला जात आहे.

Web Title: Organic rice cultivation in Tiroda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.