संघटन बुथस्तरावर मजबूत करणे गरजेचे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:18+5:302021-06-25T04:21:18+5:30
गोंदिया : क्रांतिकारी लोकहिताच्या कामांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासू नेता बनले आहेत. तेथे त्यांच्या व भारतीय ...
गोंदिया : क्रांतिकारी लोकहिताच्या कामांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासू नेता बनले आहेत. तेथे त्यांच्या व भारतीय जनता पक्षाच्याविरोधात अपप्रचार करणारे कमी नाहीत. अशांना उत्तर देण्यासाठी भाजपच्या प्रत्येक शक्ती केंद्र व बुथस्तरावर कार्यकर्त्यांना जोडून मजबूत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित प्रमुख कार्यकर्ता, शक्ती केंद्र व बुथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की, जेथे राज्यातील महाविकास आघाडीतील नेते १०० कोटी रुपये वसुलीसारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी आहेत. मोदी सरकारविरोधात आतापर्यंत भ्रष्टाचाराचा एकही भक्कम आरोप करू शकलेली नाही. कारण भाजपचा पारदर्शकतेवर अधिक भर आहे. महाविकास आघाडी सरकारला कोरोना रुग्णांसाठी खाटा, ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देता आली नसल्याचा आरोप केला. प्रदेश उपाध्यक्ष व गोंदिया विधानसभा प्रभारी माजी आमदार हेमंत पटले यांनी, मोदींच्या कामांना जनतेचे समर्थन आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला घेऊन विरोधक आंदोलन करीत आहेत. मात्र भाजप सरकारला दिलेल्या कराचा पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होत आहे. शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत, घरकुल, मोफत लसीकरण करविले जात आहे, तर महाविकास आघाडी सरकार विजेचे बिल माफ करू शकली नसल्याचा आरोप केला. सभेला अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, राजकुमार कुथे, अर्जुन नागपुरे, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, राजेश चतुर, धनलाल ठाकरे, सुनील केलनका, भावना कदम, माधुरी हरिणखेडे, निर्मला मिश्रा, लोकचंद दंदरे, देवेंद्र मानकर, अशोक मेंढे, अशोक गोखले, संदीप असाटी, नटवरलाल जैतवार, श्यामलाल ठाकरे, धुरनलाल सुलाखे, जगतराय बिसेन, टिकाराम भाजीपाले, संतोष घरसेले, योगराज रहांगडाले, यादोराव रहांगडाले, आत्माराम दसरे उपस्थित होते.