नांदी निवडणुकीची चांदी कार्यक्रम आयोजकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:11 PM2019-02-10T21:11:56+5:302019-02-10T21:12:40+5:30

मागील साडेचार वर्ष लोकप्रतिनिधी तसेच पुढाऱ्यांकडे साहेब आमच्या गावात एखादा कार्यक्रम घ्या अशी विनंती घेवून कार्यकर्ते आणि गावकºयांना जावे लागत होते. त्यानंतर एखादा कार्यक्रम घेतला जात होता. मात्र आता दोन महिन्यावर लोकसभेची निवडणूक होवू घातल्याने नेमके याविरुध्द चित्र आहे.

Organizers of the Silver Medal Election | नांदी निवडणुकीची चांदी कार्यक्रम आयोजकांची

नांदी निवडणुकीची चांदी कार्यक्रम आयोजकांची

Next
ठळक मुद्देग्रामीण भागात कार्यक्रमांचा मेळा : जनसंपर्क वाढविण्यावर भर

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील साडेचार वर्ष लोकप्रतिनिधी तसेच पुढाऱ्यांकडे साहेब आमच्या गावात एखादा कार्यक्रम घ्या अशी विनंती घेवून कार्यकर्ते आणि गावकऱ्यांना जावे लागत होते. त्यानंतर एखादा कार्यक्रम घेतला जात होता. मात्र आता दोन महिन्यावर लोकसभेची निवडणूक होवू घातल्याने नेमके याविरुध्द चित्र आहे. सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि भावी उमेदवार हे कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठितांशी संपर्क साधून गावात कार्यक्रम ठेवण्याचा आग्रह धरत आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणार खर्च सुध्दा सहज आयोजकांना कुठली किरकिर न करता सहज मिळत आहे. त्यामुळे नांदी निवडणुकीची अन चांदी कार्यक्रम आयोजकांची असेच चित्र पाहयला मिळत आहे.
यंदा लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या सुध्दा निवडणुका होणार आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस केव्हाही लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आचार संहिता लागू केली जावू शकते. आचार संहिता लागू झाल्यानंतर खर्चावर आणि कार्यक्रमावर सुध्दा मर्यादा येतात. प्रत्येक कार्यक्रमाचा खर्च दाखविणे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सुध्दा शक्य होत नाही. त्यामुळे आचार संहितेपूर्वीच कार्यक्रमांच्या माध्यमातून जेवढा व्यापक संपर्क साधता येईल. तेवढा साधण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांच्या भावी उमेदवारांकडून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र ज्या पक्षश्रेष्ठींकडून आतून उमेदवारीची हिरवी झेंडी मिळाली आहे त्यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच मागील साडेचार वर्षांत गावाकडे कधी न फिरकणारे सुध्दा स्रेहसंमेलन, महिला मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांना आवर्जून हजेरी लावत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे पीक आल्याचे चित्र आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना काही कार्यक्रमांमुळे आयोजकांना सुध्दा सुगीचे दिवस आले आहे.
आमदारांचा भूमिपूजनावर जोर
लोकसभेनंतर काहीच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांसमोर जातांना अडचण होवू नये, यासाठी बहुतके सर्वच आमदारांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडका लावला आहे. रस्ते, सभामंडप, नालीबांधकाम, खडीकरण यासह इतर कामांचा यात समावेश आहे. यात काही गैर नसले तरी भूमिपूजन केलेली किती कामे मार्गी लागतात हे सुध्दा महत्त्वाचे आहे.
यात्रा असणार टार्गेट
जिल्ह्यात महाशिवरात्री निमित्त ठिकठिकाणी यात्रा भरते. या निमित्त लाखो भाविक एकाच ठिकाणी भेटतात. त्यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार ही नामी संधी सोडत नाही. महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रा व इतर कार्यक्रमांना हजेरी हे लोकप्रतिनिधींचे टार्गेट असणार आहे.
पक्षात आऊटगोर्इंग-इनकमिंग सुरू
लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक या दरम्यान या पक्षातून त्या पक्षात जाण्याचे सत्र सुरू होते. नेमके तेच चित्र मागील दोन महिन्यांपासून पाहयला मिळत आहे. सर्वच पक्षातर्फे कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाचे छायाचित्र आणि प्रसिध्द पत्रक पाठविले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या आऊट गोर्इंग आणि इन कमिंगचे सत्र सुरू आहे. मात्र यामुळे नेमके कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते किती हे कळायला मार्ग नाही.

Web Title: Organizers of the Silver Medal Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार