स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:58+5:302021-07-01T04:20:58+5:30

सालेकसा : जिल्हा पोलीस दलातर्फे आदिवासी भागातील मुला-मुलींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ...

Organizing competitive examination and police recruitment guidance camp | स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Next

सालेकसा : जिल्हा पोलीस दलातर्फे आदिवासी भागातील मुला-मुलींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वाटप तसेच दुचाकी व चारचाकी वाहन चालक परवाना वाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. २८) करण्यात आले होते.

कार्यक्रम दरम्यान सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले यांच्या हस्ते नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासी मुला-मुलींना शाळा शिक्षण उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कम्युटी पोलिसिंग अंतर्गत घेण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहन चालक परवान्याचे वाटप करण्यात आले. बघेले यांनी, नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वतःचे व्यक्तिगत अनुभव सांगत समोर आलेल्या अडचणींचा खंबीरपणे सामना करून यशस्वी होण्याच्या कानमंत्र देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. तसेच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन पोलीस दलात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम पोलीस अधीक्षक पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार बघेले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सशस्त्र दूरक्षेत्र बिजेपार प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश शिंदे, परी. पोउपनि पांडुरंग मुंडे, परी. पोउपनि राजीव केंद्रे व सशस्त्र दूरक्षेत्र बिजेपार येथील सर्व पोलीस अंमलदारांच्या यांच्या उपस्थितीत पार पडला.

................

Web Title: Organizing competitive examination and police recruitment guidance camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.